सोलापूरात बँक कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय संप शंभर टक्के यशस्वी
संपाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना यूएफबीयूचे सोलापूर जिल्हा समन्वयक कॉम्रेड सुहास मार्डीकर यांनी सांगितले की, सन 2015 पासून बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. डिजिटल बँकिंग, ऑनलाइन व्यवहार व मोबाईल बँकिंगचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात असतानाही, बाराव्या द्विपक्षीय करारानुसार इंडियन बँक असोसिएशनने मान्यता दिल्यानंतरही सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सध्या बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कमतरता असून, त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रचंड कामाचा ताण वाढत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. या सर्व बाबी लक्षात घेता बँकांना तातडीने पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, अशी ठाम मागणी युनियनने केली.
या आंदोलनात कॉम्रेड सिद्धाप्पा बिडवे, कॉम्रेड सचिन संकद, कॉम्रेड धनंजय होनमाने, कॉम्रेड अतुल कुलकर्णी, कॉम्रेड हारून सय्यद, कॉम्रेड अविनाश गुरव, कॉम्रेड अमोल सांगळे, कॉम्रेड सुधीर गोसावी, कॉम्रेड ऑबरी अल्मेडा, कॉम्रेड विलास कोले आदी नेत्यांनी मार्गदर्शन केले.
निदर्शनात सुमारे २५० ते ३०० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महिला कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. शांततेच्या मार्गाने पण ठाम भूमिकेतून हे आंदोलन पूर्णतः यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
.png)
0 Comments