माढा नगरपंचायतीत दोन्ही रिक्त पदांची भरपाई, गाडेकर-साबळे निवडले
माढा (कटूसत्य वृत्त) – माढा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिन साबळे आणि माढा शहर विकास आघाडीचे दिनेश गाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर दोघांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
मंगळवारी नगरपंचायतीच्या नामनिर्देशित सदस्य पदासाठी निवड आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी चंद्रकांत कांबळे आणि अरविंद खरात यांनी राजीनामा दिल्यामुळे या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. काँग्रेसकडून मीनल साठे व सचिन रमेश साबळे यांची शिफारस केली गेली, तर माढा शहर विकास आघाडीच्या वतीने संजीवनी भांगे यांनी दिनेश गाडेकर यांची शिफारस केली. दोघांचे अर्जच असल्यामुळे विशेष सभेचे पीठासन अधिकारी व अकलूजचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी दोघांची नियुक्ती जाहीर केली.
या सोहळ्यात नगराध्यक्ष मीनलताई साठे, उपनगराध्यक्ष कल्पना जगदाळे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नेहा कंठे, नगरसेविका संजीवनी भांगे, माजी उपसरपंच राजेंद्र चवरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

0 Comments