Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला येण्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना निमंत्रण

 ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला येण्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना निमंत्रण 





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रासह आंध्र आणि कर्नाटकातील लाखो भावीकांचे श्रद्धास्थान आपलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या जानेवारी महिन्यात पार पडणाऱ्या यात्रेतील अक्षता सोहळ्यास राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी येऊन यात्रेचा सोहळा याची देही याची डोळा पहावा यासाठी अजितदादा पवार राष्ट्रवादीचे सोलापूरचे सोशल मीडिया प्रमुख वैभव गंगणे यांनी शासकीय विश्रामगृह येथे अण्णा बनसोडे यांना सिद्धेश्वर महाराज यात्रेतील नंदिध्वजधारकाची प्रतिकृती आणि निवेदन दिले.
   सालाबादाप्रमाणे सोलापुरात जानेवारी महिन्यात ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा सोहळा दिमाखदार वातावरणात पार पडतो. हा दिव्य सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी लाखो भावीक येत असतात. उपमुख्यमंत्री अजितदादा आणि अण्णा बनसोडे यांनीसुद्धा हा सोहळा आवर्जून वर्णावा असे वैभव गंगणे यांनी सांगितले.

यावेळी शहर - जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, जेष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,आनंद चंदनशिवे, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का, संघटक दत्तात्रय बडगंची, युवक प्रदेश सरचिटणीस महेश कुलकर्णी, 
अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख, OBC सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद, कार्याध्यक्ष आयुब शेख, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे, 
वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख , मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, संघटक सचिन चलवादि, कामगार आघाडी अध्यक्ष मार्तंड शिंगारे,कार्याध्यक्ष संजय सांगळे , दिव्यांग सेल विभाग अध्यक्ष एम एम इटकळे, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, प्रवीण गाडे , यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments