प्रभाग नऊ मधील प्रचारात सरताज शेख यांच्या आघाडीमुळे शिंदे सेनेला प्रभाग ताब्यात घेण्याची सुवर्णसंधी
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या जोरदार प्रचारामुळे लखनभाऊ कोळी विजयाच्या दिशेने
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
प्रभाग नऊ मध्ये यंदा शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा झेंडा फडकण्याचे आता निश्चित झाले आहे.शिवसेना शिंदे पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मोहोळ मधील सभेपासून या प्रभागातील वातावरण मोठ्या प्रमाणात बदलताना जाणवले. नगर विकास विभागाच्या माध्यमातून सरताज या भरीव निधी विकासासाठी आणून प्रभाग नऊ मधील सर्व विकासकामे मार्गी लावू शकतात. आणि स्थानिकांचे प्रश्न लखनभाऊ कोळी सोडवू शकतात अशी खात्री मतदारांना झाल्यामुळे या दोघा उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मोहोळ शहराच्या दक्षिण भागातील प्रभाग क्रमांक नऊ मधील राजकीय समीकरणे दिवसें दिवस मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. या प्रभागात शिवसेना शिंदे पक्षाच्या सर्वसाधारण प्रवर्गातील उच्चशिक्षित आणि युवा उमेदवार सरताज सर्फराज सय्यद यांना वाढणारा पाठिंबा दिवसेंदिवस या निवडणुकीतील निर्णायक स्थिती दर्शवत आहे. शिवाय प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कार्यकर्त्यांनी केलेल्या जोरदार प्रचारामुळे दुसरे उमेदवार लखनभाऊ कोळी देखील विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.सरताज सय्यद यांच्या प्रचारासाठी त्यांचे पती आणि शिवसेना शिंदे पक्षाचे युवा नेते सर्फराज सय्यद यांनी तर लखन भाऊ कोळी यांचे बंधू सागर कोळी यांनी पहिल्या दिवसापासून राबवलेली प्रचार यंत्रणेची रणनीती आता निश्चितपणे शिवसेना शिंदे पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हाच्या विजयाला मोठा हातभार लावत आहे.
चौकट
शिवसेनेचे उमेदवार लखन कोळी हे या प्रभागातील स्थानिक उमेदवार असून काहीही झालं तरी यंदा स्थानिक उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करून नगरपरिषद पाठवायचा निर्धार प्रभागातील जनतेने केला आहे. प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीच्या सुखदुःखात सहभागी होणारे लखनभाऊ कोळी आणि त्यांचे बंधू सागर कोळी यांचा प्रभागातील शेकडो मित्रपरिवार या निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात अभुतपुर्व आणि गतिमान पद्धतीने कामाला लागला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या उमेदवारांची गाळण उडताना दिसत आहे. त्यामुळे यंदा या प्रभागावर लखन भाऊ कोळी यांच्या रूपाने शिवसेनेचा भगवा फडकण्याचे आता निश्चित मानले जात आहे.
चौकट
सरताज सय्यद या शिवसेना शिंदे पक्षाच्या एक सुशिक्षित आणि युवा चेहरा म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उच्च शिक्षण झालेल्या सरताज यांचे वक्तृत्व त्याचबरोबर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची मनोमन जाण या बाबीच त्यांना या प्रचारात लोकप्रिय बनवताना ठरत आहेत. प्रथमच या प्रभागाला इतका उच्चशिक्षित आणि युवा चेहरा उमेदवारीच्या रूपात मिळाल्यामुळे या प्रभागातून सरताज सय्यद यांनाच विजयी करून नगरसेवक म्हणून नगरपरिषदेत पाठवायचंच असा दृढ निर्धार युवा आणि युवती मतदारांनी त्याचबरोबर महिला भगिनींनी केल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
.jpg)

0 Comments