Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी येथे डॉ. अमित पावले, डॉ. गुरुनाथ परळे यांच्या विशेष सन्मानाचे शनिवारी आयोजन...

 टेंभुर्णी येथे डॉ. अमित पावले, डॉ. गुरुनाथ परळे यांच्या विशेष सन्मानाचे शनिवारी आयोजन...

..राजयोगिनी उषा दिदींचे अध्यात्मिक प्रवचन..
                      रणजीतसिंह शिंदे 

 प्रतिनिधी | टेंभुर्णी 
        विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा टेंभुर्णीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कीर्तीचे हृदयरोग तज्ञ डॉक्टर अमित पावले , सोलापूरचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर गुरुनाथ परळे यांचे सह वैद्यकीय क्षेत्रातील इतर मान्यवरांच्या हृद्य सन्मान सोहळ्याचे शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी  टेंभुर्णी येथील पुष्पक मंगल कार्यालयामध्ये  विशेष सन्मानाचे आयोजन करण्यात आले असून याचवेळी माउंट आबू राजस्थान येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या आंतरराष्ट्रीय अध्यात्मिक  वक्त्या राजयोगिनी उषा दिदी यांचे' सुखी जीवनाचा आधार, श्रेष्ठ कर्म' या विषयावर विशेष प्रवचन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत सिंह शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. याप्रसंगी माजी आमदार विनायकराव पाटील, अकलूज सेंटरच्या संचालिका शिवरात्री बहनजी, टेंभुर्णीच्या संचालिका अनिता बहनजी, भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे ,माढा विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ढवळे, संभाजी गोटू पाटील, दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत समारंभ नंतर अनिता बहनजी यांनी ब्रह्माकुमारी संस्थेचा परिचय करून दिला. याप्रसंगी शिवरात्री बहनजी म्हणाल्या की राजयोगिनी ब्र.कु. उषा दीदी यांनी भगवद्गीता आणि रामायण या ग्रंथाविषयीचे अध्यात्मिक रहस्य विषयी सखोल अभ्यास केलेला आहे. टेंभुर्णी शहरातील 20 डिसेंबरचा कार्यक्रम हा ईश्वरीय योगायोग असून अध्यात्म आणि विज्ञानाचा मनोज्ञ संगम दिसून येतो. भाग्यविधाते बबनदादा शिंदे यांचेवर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया डॉक्टर अमित पावले यांनी यशस्वी केली तर अध्यात्मिक प्रवचन देणाऱ्या राजयोगिनी उषादिदी यांचे सह ईतर ब्रह्माकुमारी परिवारांनी दादांची शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी म्हणून राज योगाद्वारे शुभसंकल्प आणि शुभ भावना व्यक्त केल्या आहेत. रणजीत शिंदे यांनी केलेल्या सेवेविषयी व सन्मान कार्यक्रमाचे आयोजनाबद्दल बहनजींनी त्यांचेही  कौतुक केले व धन्यवाद दिले.     
          याप्रसंगी रणजीतभैय्या शिंदे म्हणाले की डॉक्टर अमीत पावले हे जागतिक कीर्तीचे हृदयरोग तज्ञ असले तरी ते टेंभुर्णीचे रहिवासी असून आपणा सर्वांना त्यांचा  अभिमान आहे. ते स्वतः देखील नियमित राजयोग मेडिटेशन करतात कारण त्यांचे माता-पिता मागील 45 वर्षापासून ओम शांती ज्ञानात असून डॉक्टर अमित पावले यांचे वर लहानपणापासून हेच  संस्कार झालेले आहेत. डॉक्टर अमित पावले अमेरिकेतील सेंट लुईस येथील बी जे सी हॉस्पिटल मधील निष्णात हार्ट सर्जन असून अध्यात्मिक ज्ञानाचे देखील ते अभ्यासक  आहेत.  विशेष  माहिती सांगताना रणजीत शिंदे म्हणाले की अमेरिकेमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर देहदान करतात , यामुळे किमान पाच व्यक्तींना तरी पुनर्जन्म मिळतो. या ठिकाणी 93% हार्ट सर्जरी  यशस्वी होतात. नागरिकांनी अवयव दान करावे हा प्रसार भारतात होणे अतिशय गरजेचे आहे. शनिवारी कार्यक्रमानंतर किमान दीड हजार लोकांच्या जेवणाचे आयोजन केले  असल्याचे रणजीत शिंदे यांनी आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बी.के.टं प्रशांत लोंढे यांनी केले.


*************
वरील कार्यक्रमाची जाहिरात मिळण्याची शक्यता आहे तरी बातमी चांगली लावून घेणे ही नम्र विनंती
Reactions

Post a Comment

0 Comments