Hot Posts

6/recent/ticker-posts

तपोरत्नं पुण्यस्मरण; नेताजी शिक्षण संस्थेत ३१४ जणांचे रक्तदान

 तपोरत्नं पुण्यस्मरण; नेताजी शिक्षण संस्थेत ३१४ जणांचे रक्तदान



सोलापूर (कटुसत्य वृत्त):- श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३१४ रक्तदात्यांनी रक्तदान करुन श्रीगुंरुच्या चरणी सेवा समर्पित केले.
 निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संकुलात १५३ जणांनी तर विनायक नगर येथील राजराजेश्वरी शिक्षण संकुलात १६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
प्रथम श्री तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष धुमशेट्टी, विजयकुमार हुल्ले, सेवानिवृत्त शिक्षक धर्मराज बळ्ळारी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले  तर राजराजेश्वरी शिक्षण संकुलात प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार आदी मान्यवरांच्या हस्ते शिबीराचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार म्हणाले, पुज्य महास्वामीजींनी आपले संपूर्ण जीवन हे भक्तांच्या कल्याणासाठी घालविले. त्यांचे धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्य आज ही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची प्रचार व प्रसार करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आज बहुसंख्य रक्तदात्यांनी गुरुंच्या चरणी सेवा समर्पित करुन खरोखरच गुरुंचे आशीर्वादास पात्र झाल्याचे सांगितले.यावेळी भक्तगण, शिक्षक, पालक व माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी अक्षय ब्लड बँक व कुंभारीच्या अश्विनी रक्तपेढीने रक्त संकलन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वाराध्य मठपती व हणमंत कुरे यांनी केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी नेताजी शिक्षण संस्थेच्या दोन्ही संकुलातील प्राथमिक, इंग्लिश मिडीयम स्कूल, माध्यमिक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments