Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर नगरपरिषद प्रभाग क्रमांक 7 ब साठी 20 डिसेंबरला मतदान

 पंढरपूर नगरपरिषद प्रभाग क्रमांक 7 ब साठी 20  डिसेंबरला मतदान

     

 

             

        पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर नगरपरिषद  निवडणुकीसाठी  प्रभाग क्रमांक 7 ब मध्ये राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  या प्रभागात पाच उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवीत असून, या प्रभागातील सहा मतदान केंद्रावर मतदान होणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली

    या मतदानासाठी ईव्हीएम मतदान यंत्र सील करण्याची प्रक्रिया 19 डिसेंबर 2025 रोजी पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यात येणार आहे.  या प्रभागासाठी नियुक्त निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक निवडणूक प्रशिक्षण  देण्यात आले आहे. सहा मतदान केंद्रावर  प्रत्येकी एक याप्रमाणे सहा ईव्हीएम मशीन उपलब्ध राहणार आहे. तसेच चार राखीव मतदान यंत्राची तरतूद करण्यात आली आहे.

            प्रभाग क्रमांक सात ब येथील मतदारांना दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत  मतदान करता येणार आहे. 7 ब  प्रभागातील मतदान शांततापूर्ण व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी नगरपालिका प्रशासनाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली


Reactions

Post a Comment

0 Comments