Hot Posts

6/recent/ticker-posts

निमा सोलापूरच्या वतीने 'एसीएस निमाकॉन' राज्यस्तरीय वैद्यकीय परिषद

 निमा सोलापूरच्या वतीने 'एसीएस निमाकॉन' राज्यस्तरीय वैद्यकीय परिषद




 गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), सोलापूर शाखा आणि सोलापुरातील एसीएस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी अक्कलकोट रोड एम.आय.डी.सी. येथील महालक्ष्मी बँक्वेट्स येथे 'एसीएस निमाकॉन २०२५'  या  राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नीमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
          गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नवीन संशोधन आणि प्रगत उपचार पद्धतींची माहिती डॉक्टरांना मिळावी, या उ‌द्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ए.सी.एस. हॉस्पिटल हृदयरोगतज्ञ डॉ. राहुल कारीमुंगी, डॉ. प्रमोद पवार, डॉ. सिद्धांत गांधी आणि डॉ. दीपक गायकवाड हे 'फ्युचर ऑफ कार्डियाक इंटरव्हेंशन' यावर सविस्तर माहिती व हृदयरोग उपचारातील आधुनिक तंत्रज्ञान ब‌द्दलचे प्रात्यक्षिके सादर करणार आहेत.शॉक मॅनेजमेंटः डॉ. प्रशांत दोंड, त्वचारोग (फंगल इन्फेक्शन) यावर डॉ. डी. जी. सपळे मार्गदर्शन करणार आहेत.  यामध्ये डॉ. सुनील हिलालपुरे ( सीबीसी रिपोर्ट रिडिंग), डॉ. विनोद बन (कफ मॅनेजमेंट), डॉ. सुजित जहागीरदार (यकृताचे आजार), डॉ. रणजित कदम (हेड इंजुरी) डॉ. मीनल चिडगुपकर (वंध्यत्व निवारणमधील अत्याधुनिक उपचारपद्धती) आणि डॉ. प्रफुल्ल कल्याणकर (फायनान्सियल प्लॅनिंग) यांचाही समावेश असणार आहे. सुमारे एक हजार डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत.
          जास्तीत जास्त डॉक्टरांनी आणि मेडिकल स्टुडंट्स यांनी या ज्ञानसत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन निमा सोलापूर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी डॉ. शिवशंकर खोबरे 9370424797, डॉ. सुनील खट्टे 9527615203 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन प्रसिद्धी प्रमुख डॉ. उत्कर्ष वैद्य यांनी केले आहे.
          या पत्रकार परिषदेला प्रोजेक्ट हेड डॉ. सुभाष भांगे, चेअरमन डॉ. अमोल माळगे, सेक्रेटरी डॉ. आशिफ शेख, खजिनदार डॉ. अभिजित पुजारी, डॉ. नितीन बलदवा निमा सोलापूरचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमणी, कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण ननवरे, एसीएस हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रमोद पवार डॉ. राहुल कारीमुंगी, डॉ. सिद्धांत गांधी, डॉ. दीपक गायकवाड - पाटील, डॉ. श्रुती मराठे, डॉ. अश्विनी देगावकर आदी उपस्थित होते.

चौकट १
निमा ही इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर यांची देशभरातील सर्वात मोठी संघटना आहे. इंटिग्रेटेड प्रॅक्टिशनर यांना वैद्यकीय क्षेत्रात होणारे विविध संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान याबद्दलची माहिती अवगत करण्यासाठी या राज्यस्तरीय कॉन्फरन्स चे आयोजन सोलापुरात करण्यात आले आहे. तरी सर्व इंटिग्रेटेड प्रॅक्टिशनर डॉक्टरांनी या कॉन्फरन्स मध्ये सहभागी होऊन आपले ज्ञान अद्ययावत करावे.
- डॉ. विनायक टेंभुर्णीकर, मा. राष्ट्रीय अध्यक्ष निमा सेंट्रल.

चौकट २
सोलापुरातील एसीएस हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हृदयरोगावर यशस्वी उपचार केले जातात. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून गुंतगुंतीच्या शस्त्रक्रिया सोलापुरातील एसीएस हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे करण्यात येत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उपचार पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल झालेले आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाचा व त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचा परिचय व प्रात्यक्षिक कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व डॉक्टरांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा मानस आहे. जेणेकरून रुग्णांच्या मनातील भीती व शंका डॉक्टरांच्या माध्यमातून दूर होऊन जास्तीत जास्त रुग्णांना त्याचा लाभ घेता येईल.
- डॉ. राहुल कारिमुंगी. हृदयरोग तज्ञ व संचालक ACS हॉस्पिटल सोलापूर.
Reactions

Post a Comment

0 Comments