संयुक्त विकास आघाडी कडून उमेदवाराच्या मुलाखती
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका निवडणुकी संदर्भात आठ पक्षांनी एकत्रित येऊन संयुक्त विकास आघाडीची स्थापना केली. या संयुक्त विकास आघाडीच्या वतीने आज आघाडीच्या संपर्क कार्यालयात मुलाखती घेऊन अर्ज स्वीकारण्यात आले आहे.
सोलापूर महानगरपालिका सन 2025 -2026 सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात सोलापूरच्या विकासाचा मुद्दा घेऊन, जनविकास क्रांतीसेना, भारतीय काँग्रेस पक्ष, लेबर पार्टी,जनशक्ती काँग्रेस पक्ष, आर.पी.आय डेमोक्रॅटिक पक्ष, समाजवादी पक्ष, परिवर्तन समता पार्टी व ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक अशा आठ पक्षानी मिळून संयुक्त विकास आघाडीची स्थापना करण्यात आली या आघाडीच्या माध्यमातून सर्व घटक पक्षांच्या उमेदवारांच्या मुलाखतीस आज पद्मशाली चौक येथील संयुक्त विकास आघाडीच्या कार्यालयात सुरुवात झाली. यावेळी संयुक्त विकास आघाडीचे निमंत्रक विष्णू कारमपुरी (महाराज ) व आघाडीचे एम.डी शेख, साथी बशीर शेख, एडवोकेट विक्रम कसबे, बाळासाहेब गायकवाड, इमाम खान, संभाजी मस्के, खिज्जर पिरजादे यांच्या उपस्थितीत घटक पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी मुलाखत घेऊन अर्ज स्वीकारण्यात आले. यावेळी इच्छुकांनी प्रभाग क्रमांक 20, 13, 21, 17, 14, 22, 9, 15 व 6 या प्रभागातील इच्छुकांनी अर्ज भरला. इच्छुकांनी अर्ज भरण्याची मुदत 26 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. या मुदतीत सर्व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित रहावे असे आवाहन विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी केले.
सदर प्रसंगी वरील मान्यवरांसह रेखा अडकी, गुलाब लालकोट, इकबाल पेरमपल्ली , लक्ष्मीबाई ईप्पा, विठ्ठल कुऱ्हाडकर, सुवर्णा चन्मय, सुनीता चव्हाण, पद्मा मॅकल, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, लक्ष्मीबाई मालपुरी, लक्ष्मी रच्चा, रामबाई माटेटी, लक्ष्मी येमुल, कस्तुरीबाई गायकवाड, प्रसाद जगताप, पप्पू शेख, गोवर्धन मुदगल पार्वती बरबडे, किरण क्षीरसागर, सिद्राम ढोबळे यांच्यासह इच्छुक उमेदवार व सर्व घटक पक्षाचे उमेदवार कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments