अनगरच्या बाबुराव पाटील महाविद्यालयांमध्ये एकदिवशीय कार्यशाळा संपन्न
अनगर (कटूसत्य वृत्त):- बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अनगर याच्या रोप्य महोत्सवानिमित्त व पुण्यश्वोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनशास्र,वनस्पतीशास्र,भूगर् भशास्र व गणित या विषयाची एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे तथा उदघाटक म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ.प्रकाश महानवर हे होते व अध्यक्षस्थानी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील हे होते.
या प्रसंगी बोलताना डाॅ.प्रकाश महानवर म्हणाले की विद्यापीठ व महाविद्यालय यांनी एकत्रित येऊन विद्यार्थी केंद्रीत अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास केला पाहिजे.विद्यापीठ व महाविद्यालय यांच्यामध्ये सामंजस्य करार करुन अनेक उपक्रम घेतले पाहिजेत विद्यापीठ आपल्याला प्रत्येक उपक्रमाला सहकार्य करेल .
या प्रसंगी मा.आ.राजन पाटील यांनी कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रमाचा उपयोग स्वतःबरोबर,समाजाची व देशाची प्रगती करण्यासाठी उपयोगी ठरेल तसेच शैक्षणिक प्रगती याविषयी मार्गदर्शन केले.या प्रसंगी वनस्पतीशास्र या विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारीत प्रा.डाॅ.तुषार रोडगे व प्रा.डाॅ.रविंद्र देशमुख लिखित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक डाॅ.विजयकुमार उबाळे,पु.अ.हो.सो.वि.सोलापूर येथील स्कूल आॅफ केमिकल सायन्सचे संचालक प्रा.डाॅ.ए.ए.घनवट,रसायनशास्र विषयाचे चेअरमन प्रा.डाॅ.एस.आर.पुजारी,वनस्पती शास्रचे चेअरमन प्रा.डाॅ.एम.एन.जगताप,गणितचे चेअरमन प्रा.डाॅ.ए.एम.महाजन व भूगर्भशास्रचे चेअरमन प्रा.डाॅ.एम.एन.राऊत व विविध विषयाचे विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रा.डाॅ.विशाल कदम यांनी करुन दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ.रविंद्र देशमुख यांनी केले व आभार प्रा.डाॅ.नितीन गुंड यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी अनगरच्या बाबुराव पाटील महाविद्यालयांमध्ये एकदिवशीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील, प्राचार्य डॉ.चंद्रकांत सूर्यवंशी, दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक डाॅ.विजयकुमार उबाळे,स्कूल आॅफ केमिकल सायन्सचे संचालक प्रा.डाॅ.ए.ए.घनवट, प्रा.डाॅ.एस.आर.पुजारी, प्रा.डाॅ.एम.एन.जगताप,गणितचे चेअरमन प्रा.डाॅ.ए.एम.महाजन प्रा.डाॅ.एम.एन.राऊत आदी
0 Comments