वार्षिक क्रीडा महोत्सव अतिशय जल्लोषात साजरा
अकलूज (कटूसत्य वृत्त):- 23 डिसेंबर व 24 डिसेंबर रोजी शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शिवरत्न स्कूल,शंकराव मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल व शिवरत्न सेमी स्कूल यांचा वार्षिक क्रीडा महोत्सव विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे अतिशय जल्लोषात साजरा झाला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती भारतीय बास्केटबॉल संघाचे प्रशिक्षक संभाजी कदम सर त्याच बरोबर शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ शीतलदेवी धैर्यशील मोहिते पाटील व संचालक मंडळाच्या उपस्थित पार पडला. यावेळी सहकार महर्षी व अक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.त्यानंतर विद्यार्थ्यांचे संचलन देशाचे उत्तम नागरिक होऊ या आशयाची शपथ, त्यानंतर उपस्थित संभाजी कदम यांच्या भाषणाने या कार्यक्रमाला चार- चांद लावले. विद्यार्थी व प्रमुख पाहुणे यांच्यात झालेला स्फूर्तीदायक संवाद विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणारा होता.
विद्यार्थ्यांनी कष्ट केले तर कोणतेही ध्येय ते आयुष्यात साध्य करू शकतात असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणातून केले. इंटर हाऊस स्पर्धेत बक्षीस विजेत्या खेळाडूंना सन्मानित करण्यासाठी इंटरनॅशनल फोटो प्लेयर रामजी कश्यप यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास करिता अकलूज नगर परिषदेचे कार्यकारी अधिकारी सचिन पाटील हे देखील उपस्थित होते.संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव धर्मराज दगडे सर श्रीकांत सर,बनकर सर अनिल जाधव सर लिके सर यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली. शिवरत्न शिक्षण संस्थेचे अधिकारी अशरब शेख त्याचबरोबर शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल चे प्रिन्सिपल अल्बर्ट थरकण सर, शिवरत्न स्कूलच्या प्रिन्सिपल बिनो मॅडम,शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल माने देशमुख उपस्तिथ होते.
0 Comments