१६ डिसेंबरपासून इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्विकारणार- संतोष पवार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मंगळवार १६ डिसेंबरपासून इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्विकारण्यात येणार असल्याची माहिती अजितदादा पवार राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी दिली.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सोलापूरचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे, सहसंपर्कमंत्री आण्णा बनसोडे यांच्या आदेशान्वये आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची तयारी जोमाने सुरु आहे. सहसंपर्कमंत्री आण्णा बनसोडे यांचा नुकताच तीन दिवसांचा सोलापूर दौरा झाला आहे.तसेच नागपूर येथे सोलापूर शहरातील पाणी प्रश्न आणि विविध समस्यांवर बैठक आयोजित करून त्यासंदर्भात मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत पिण्याचे पाणी पुरवठा बंद करण्याच्या सुचना देऊन त्यावर अंमलबजावणी करण्यात आली. सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व १०२ जागेवर उमेदवार उभे करणार असून अब की बार ७५ पारचा नारा सहसंपर्कमंत्री अण्णासाहेब बनसोडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिला होता. अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच अनेक मान्यवरांनी पक्षात प्रवेश केला आहे. आणखी दिग्गज नेते पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सोलापुरात पोषक वातावरण तयार झाले असून इच्छूक उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे.
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजण्याची शक्यता असून त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सोलापूर महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मंगळवार १६ डिसेंबरपासून गुरुवार १८ डिसेंबरपर्यंत सलग तीन दिवस दररोज सकाळी ११ ते २ या वेळेत जुनी मिल कंपाउंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालय येथे स्विकारणार येणार आहेत.
यावेळी राष्ट्रवादीचे सर्व जेष्ठ नेते प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत .
महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीसाठी सकारात्मक वातावरण दिसून येत असून राष्ट्रीयचे अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह संपर्कमंत्री अण्णासाहेब बनसोडे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत,असेही जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सांगितले.
इच्छूक उमेदवारांचे अर्ज स्विकारल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखतीची तारीख ,वेळ आणि ठिकाण ठरविण्यात येईल,असेही जिल्हाध्यक्ष पवार आणि कार्याध्यक्ष बागवान यांनी सांगितले.

0 Comments