५० लाखांचा विकासनिधी, किसन जाधव–नागेश गायकवाड यांचे नेतृत्व अधोरेखित
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अल्पसंख्यांक बहुल भागातील मूलभूत नागरी सुविधांना भक्कम बळ देत सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ येथील जन्नतुल फिरदोस कब्रस्तानसाठी रस्ता काम व सुरक्षेच्या दृष्टीने वॉल कंपाऊंड उभारणीसाठी प्रत्येकी २५ लाख रुपये, असा एकूण ५० लाख रुपयांचा निधी सन २०२५–२६ अल्पसंख्यांक बहुल नागरिक क्षेत्राकरिता क्षेत्रविकास या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. हा निधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, अल्पसंख्यांक मंत्री नामदार माणिकराव कोकाटे आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्यांक विभाग निरीक्षक, ठाणे महानगरपालिकेचे माजी गटनेते व अल्पसंख्यांक समाजाचे ज्येष्ठ नेते नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनामुळे व निर्णायक भूमिकेमुळे प्राप्त झाला आहे. प्रभागाचे कार्यसम्राट नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव तसेच नगरसेवक नागेश गायकवाड यांनी अल्पसंख्यांक बांधवांना दफनविधीच्या वेळी होणाऱ्या अडचणी, पावसाळ्यातील गैरसोय आणि कब्रस्तानच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न सातत्याने शासनदरबारी प्रभावीपणे मांडत ठोस पाठपुरावा केला होता. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून जन्नतुल फिरदोस कब्रस्तान येथे ५० लाखांचे सांस्कृतिक भवन मंजूर होऊन त्याचे भूमिपूजन नजीब मुल्ला यांच्या हस्ते पार पडले होते. त्याच भूमिपूजन सोहळ्यात किसन जाधव यांनी रस्ता व वॉल कंपाऊंडसाठी ठाम मागणी मांडली होती. त्या मागणीची दखल घेत नजीब मुल्ला यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शिफारस केली आणि त्याचा थेट परिणाम म्हणून आज हा निधी प्रत्यक्षात मंजूर झाला आहे. या कामाचे अध्यादेशही संबंधित विभागास प्राप्त झाले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक राजवट असतानाही किसन जाधव व नागेश गायकवाड यांच्या इच्छाशक्तीमुळे, पाठपुराव्यामुळे आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे प्रभागातील विकासकामे मार्गी लागत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या निधीमुळे अल्पसंख्यांक समाजात समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून समाज बांधवांनी किसन जाधव व नागेश गायकवाड यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत पुढील काळात सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली आहे. यावेळी अल्पसंख्यांक समाज बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, अल्पसंख्यांक मंत्री माणिकराव कोकाटे आणि नजीब मुल्ला यांचे विशेष आभार मानत, त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळेच हा निधी मिळाल्याची भावना व्यक्त केली. या पुढील काळात प्रभाग 22 च्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्याचे संपर्क मंत्री तथा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि सह संपर्क प्रमुख तथा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या माध्यमातून विकास साधणार असल्याचेही यावेळी किसन जाधव म्हणाले. अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणारे नेतृत्व म्हणून किसन जाधव व नागेश गायकवाड यांचा गौरव होत असून, हा विश्वास व पाठिंबा कायमस्वरूपी राहील, असा ठाम विश्वास समाज बांधवांनी व्यक्त केला आहे. निश्चितच येणाऱ्या काळात अल्पसंख्यांक समाजाच्या विकासात या दोघांचे योगदान अधिक भरीव राहील, असा सूर या निमित्ताने सर्वत्र उमटत आहे. या पत्रकार परिषदेस हाफिज सनामूल्ला, तय्यब अली, आसिफ शेख, महंमद आळगी, असलम इनामदार, महबूब कुडले, शहानवाज शेख, सैपन शेख, जाकीर शेख, सुलेमान शेख, फिरोज पठाण आदींची उपस्थिती होती.

0 Comments