सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनहित सेवा पक्ष झटणार
संस्थापक अध्यक्ष मनीष गायकवाड यांची माहिती
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जनहित सेवा पक्षाची नोंदणी नुकतेच राज्य निवडणूक आयोगाकडे केली असून या पक्षाच्या माध्यमातून सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मनीष गायकवाड यांनी दिली.
दि. 2 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडे या पक्षाची नोंदणी केली आहे. मागील वीस वर्षापासून आम्ही अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवित असून आता आम्ही सोलापुरातील प्रमुख 150 पदाधिकारी मिळून राजकीय क्षेत्रात काम करण्याची योजले आहे.सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणे मिळवून देणे, जनतेचे हित साधणे, त्यांची सेवा करण्यावर पक्ष भर देणार आहे. सर्व महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत पक्ष ताकतीने लढण्यासाठी प्रयत्नात आहे.
ज्यांना पक्षात काम करण्याची इच्छा असेल अशा लोकांनी पक्षाच्या इमेल व व्हाट्सअप वर संपर्क साधावा, असे आवाहन गायकवाड यांनी केले.
या पत्रकार परिषदेला नटराज कांबळे, सचिव जॉन्सून दंडीन आदी उपस्थित होते.

0 Comments