सोलपुरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढू लागली आहे.
विविध पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आणि शिवसेना शिंदेगटाच्या कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारलेजात आहेत.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या शिवसेना शिंदेगटाच्या जिल्हा संपर्क कार्यालयामध्ये मागील दोन दिवसांपासून उमेदवारी अर्ज देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कालावधीत जवळपास साडेचारशेहून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेल्याची माहिती कार्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या अर्जामध्ये अनेक दिग्गज, मान्यवर तसेच प्रथमच निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्या सुशिक्षित तरुण-तरुणींचा मोठा सहभाग दिसून येत आहे.
उमेदवारी अर्ज घेणाऱ्या प्रत्येक इच्छुकाने माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनावर विश्वास व्यक्त करत आपण अर्ज भरल्याची भूमिका मांडली आहे. यामुळे सोलापूर महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदेगटाकडे इच्छुक उमेदवारांचा वाढता ओघ पाहता आगामी निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसून येत आहेत.

0 Comments