Hot Posts

6/recent/ticker-posts

शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये 'सृजनरंग' महोत्सवाचा शुभारंभ

 शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये 'सृजनरंग'  महोत्सवाचा शुभारंभ




अकलूज (कटूसत्य वृत्त):- तरुणाईच्या  उज्ज्वल भविष्यासाठी व स्वाभिमानी जीवनासाठी सृजनरंग महोत्सवामध्ये सहभाग घ्यावा असे मत अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या वतीने आयोजित सृजनरंग महोत्सव समारंभानिमित्त आयोजित उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सयाजीराजे मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
         सृजनरंग महोत्सव २०२५-२६ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर यांनी केले.सृजनरंग महोत्सव समारंभाचे सुनियोजन समन्वयक डॉ.विश्वनाथ आवड यांनी केले.हा सृजनरंग महोत्सव दिनांक २३ ते २६डिसेंबर २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे.या महोत्सव प्रसंगी क्रिकेट स्पर्धा,पोस्टर्स स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा,विज्ञान प्रदर्शन,मेहंदी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मोबाईल रिल स्पर्धा इत्यादी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
         या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक नारायण फुले,सुभाष दळवी,वसंतराव जाधव व  महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रणजितसिंह माने-देशमुख, ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. अरविंद शेंडगे,महाविद्यालयाचे प्रबंधक राजेंद्र बामणे, कार्यालयीन अधिक्षक युवराज मालुसरे तसेच महाविद्यालयातील सिनियर, ज्युनिअर,व्यावसाय विभागातील प्राध्यापक वृंद,कार्यालयीन कर्मचारी वर्ग व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी,विद्यार्थीनी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायक सूर्यवंशी यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार डॉ.जनार्धन परकाळे यांनी मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments