सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत व्यक्तिशः लक्ष घालणार - अजितदादा पवार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आपण व्यक्तिशःलक्ष घालणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.
सोलापुर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी पुण्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत अजितदादांनी महानगरपालिका निवडणुकीत कोणतीही कसर न ठेवता जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. शिवाय आपण सोलापुरात व्यक्तिशः लक्ष घालणार असल्याचे बैठकीत सांगितले. राज्यात नगरपरिषदेच्या निवडणुकीत आपल्याला घवघवीत यश मिळाले असल्याने आत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतसुद्धा मोठे यश मिळण्यासाठी जोमाने कमला लागण्याच्या सूचना केल्या.
सोलापुरात राष्ट्रवादीकडे १०२ जागेसाठी तब्ब्ल ४५० इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले असल्याचा अहवाल शहर - जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सोलापूरचे सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांच्या साक्षीने अजितदादांकडे सुपूर्द केला. दादांनी इतक्या संख्येने अर्ज आल्याबद्धल सोलापूर राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत सर्वांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. संपर्कप्रमुख दत्तात्रय भरणे व सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांचे सोलापुरच्या घडामोडींवर जातीने लक्ष असणार आहे,असेही अजितदादा यावेळी म्हणाले.
दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या एमआयएमच्या नगरसेविका पूनम बनसोडे यांचे पती अजित बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्र्वादीत प्रवेश केला. अजितदादांनी बनसोडे यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचे उपरणे घालून अजित आपण अजितच आहेत, अशा शब्दात त्यांना महानगपालिकेसाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या पत्नी एमआयएमच्या नगरसेविका होत्या,त्याच प्रभागातून आता स्वत राष्ट्रवादीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार असल्याचे अजित बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी सोलापूरचे सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे ,शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले उपस्थित होते.
.png)
0 Comments