“चांदीची गदा” पटकविल्याबद्दल अन्नछत्र मंडळाच्या वतीने सत्कार
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील बादोल्याचे सुपुत्र व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या तालुक्यातील सराव करण्याऱ्या गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट ७७ जणांना दरमहा वजन गटानुसार देण्यात येतो. यातील न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले ग्रुपचे पै. मशीद शेख याने जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात देवगाव येथील श्री संत रावजीबुवा महाराज केसरी आयोजित कुस्ती स्पर्धेत डंका., ५ कुस्त्यांमध्ये विजयी होऊन “चांदीचा गदा” मिळवून प्रथम क्रमांक पटकविले आहे.
“चांदीची गदा” पटकविल्याबद्दल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते व न्यासाचे क्रियाशील सदस्य संदीपदाजी फुगे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पै. मशीद शेख यांचा सत्कार महाप्रसादालयात श्रींची प्रतिमा, चांदीचा गदा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
पै. मशीद शेख यांची ८५ किलो वजन गटात हिंद केसरी करिता सातारा जिल्हा चाचणी मध्ये निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल देखील मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व पुत्र न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
याप्रसंगी न्यासाचे क्रियाशील सदस्य मनोज निकम, सनी सोनटक्के, पिट्टू दोडमनी, प्रवीण देशमुख, अतिश पवार, न्यासाचे पुरोहित सोमकांत कुलकर्णी, नंदकुमार स्वामी, राजू शेख, शकील शेख, रसूल शेख, दत्ता माने, किरण पाटील, राम मदने, प्रवीण घाडगे, गोटू माने, सिद्धाराम कल्याणी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, महांतेश स्वामी, शावरेप्पा माणकोजी, शिव स्वामी, प्रदीप सलबत्ते, कुमार सलबत्ते, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, राहुल इंडे, विनायक भोसले, शुभम सावंत यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
.png)
0 Comments