सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शासन निर्णयान्वये महाराष्ट्र शासन, अल्पसंख्याक विकास विभाग व अल्पसंख्याक आयोग यांचेकडील संदर्भिय पत्रानुसार अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादीचे संवर्धन करता यावे यासाठी १८ डिसेंबर हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी "अल्पसंख्याक हक्क दिवस" म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
त्यानुषंगाने या दिवशी जिल्हा नियोजन समिती, सोलापूर मार्फत अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्कांबाबत जाणीव करुन देणे कामी जिल्हा नियोजन समिती कार्यालयात १८ डिसेंबर २०२५ वार गुरूवार रोजी सकाळी १०.०० वा. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूका २०२५ ची आदर्श आचार संहिता लागू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या (महानगरपालिका/नगरपालिका/नगरपं
0 Comments