Hot Posts

6/recent/ticker-posts

कृषी महाविद्यालय अकलूज ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम

कृषी महाविद्यालय अकलूज ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम


 


महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नीत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषिकन्यांनी लवंग गावात   रांगोळीच्या माध्यातून ग्रामीण भागाचे सादरीकरण केले. रांगोळीद्वारे रेखाटलेल्या आराखड्यामध्ये सर्व गावातील उपलब्ध नैसर्गिक साधन, वन स्रोत, जलस्रोत, पीक लागवड क्षेत्र, फळबागा, ग्राम पंचायत कार्यालय, शाळा दवाखाना,बस स्थानक, विविध रस्ते तसेच गावातील प्रमुख ठिकाणे दाखवण्यात आले. वयावेळी कृषिकन्या  प्रेरणा पवार, गौरी होले , ऋतुजा पवार,  सीमा सातपुते,प्राजक्ता जाधव , वैष्णवी शेळके, वैष्णवी खाडे , साक्षी डोंबाळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहित- पाटील, प्राचार्य आर. जी नलावडे(प्राचार्य रत्नाई कृषि महाविद्यालय अकलूज), प्रा. एस. एम. एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक), प्रा. एम. एम. चंदनकर (कार्यक्रम अधिकारी),प्रा. एच. वी. खराडे (कार्यक्रम अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी लवंग गावातील ग्रामस्थ उपस्थित होते


Reactions

Post a Comment

0 Comments