Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राचे कुमार खो-खो संघ सुवर्णपदक कायम राखतील

 महाराष्ट्राचे कुमार खो-खो संघ सुवर्णपदक कायम राखतील

 



प्रशिक्षण शिबिर समारोपप्रसंगी विद्यापीठ खोखोपटू अशोक मुळीक यांचा विश्वास


सोलापूर, (कटूसत्य वृत्त)-

महाराष्ट्राचे कुमार व मुली खो-खो संघ नक्कीच सुवर्णपदक कायम राखतील, असा विश्वास माजी विद्यापीठ खोखो खेळाडू अशोक मुळीक यांनी व्यक्त केला 


महाराष्ट्राच्या कुमार खो-खो संघाच्या प्रशिक्षण शिबिराचा समारोप जुळे सोलापूर येथील स्वामी विवेकानंद प्रशालेच्या मैदानावर  झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य अंबादास पांढरे, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशचे सचिव उमाकांत गायकवाड, विद्यापीठ सिनेट सदस्य अजितकुमार संगवे, प्रशिक्षक मोहन रजपूत आदी उपस्थित होते.

संघातील या खेळाडूंना श्री. मुळीक  यांच्यातर्फे बॅग व रुक्माई स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे नॅपकिन देण्यात आले. क्रीडा शिक्षक श्रीकृष्ण कोळी यांनी सूत्रसंचालन केले.


मुली संघाचे शिबिर धाराशिव येथे झाले असून दोन्ही संघ ३१ डिसेंबर, २०२५ ते ४ जानेवारी, २०२६ या कालावधीत बंगळुरू, कर्नाटक येथे होणाऱ्या ४४व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रेल्वेने रवाना झाले. रेल्वे स्टेशनवर महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव, माजी सरचिटणीस संदीप तावडे, कार्यालयीन सचिव डॉ. प्रशांत इनामदार, महेंद्र गाढवे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, खोखो असोसिएशनचे खजिनदार श्रीरंग बनसोडे आदी उपस्थित होते.


महाराष्ट्राचे संघ : कुमार गट : राज जाधव-कर्णधार, जितेंद्र वसावे, हाराद्या वसावे, सोत्या वळवी,विशाल वसावे (धाराशिव), शंभूराजे चंदनशिव, अरमान शेख,सिद्धार्थ माने- देशमुख  (सोलापूर), श्री दळवी, पार्थ देवकाते (सांगली), श्री वसावे, आदेश पाटील (पुणे), तरबेज खान (सातारा),आशिष गौतम (ठाणे), ओमकार चव्हाण (अहिल्यानगर). प्रशिक्षक : मोहन राजपूत (सोलापूर), सहा. प्रशिक्षक : सुजित माळी (लातूर), व्यवस्थापक : गणेश वारुळे (अहिल्यानगर).


मुली गट : सानिका चाफे-कर्णधार, श्रावणी तामखडे, विद्या तामखडे, सानिया सुतार(सांगली), धनश्री कंक,  प्रणिती जगदाळे, दिक्षा काटेकर, श्रुती चोरमारे(ठाणे), मैथिली पवार, राही पाटील (धाराशिव), स्नेहा लामकाणे, प्राजक्ता बनसोडे (सोलापूर), निलम मोहंडकर (नाशिक), श्वेता नवले (पुणे)

दिव्या पायले (रत्नागिरी). प्रशिक्षक :  अभिजित पाटील (धाराशिव), सहा. प्रशिक्षक : ऐश्वर्या सावंत (रत्नागिरी), व्यवस्थापिका :  उज्वला चेमटे (अहिल्यानगर).


Reactions

Post a Comment

0 Comments