Hot Posts

6/recent/ticker-posts

२२ वर्षीय सिद्धी वस्त्रे बनली नगराध्यक्ष

 २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे बनली नगराध्यक्ष




मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ नगरपरिषदेत शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. वयाच्या २२ व्या वर्षी सिद्धी वस्त्रे नगराध्यक्ष बनलीय. मोहोळमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने युती केली होती.

सिद्धी वस्त्रेसह मोहोळमधील उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली होती. सिद्धी वस्त्रे यांच्यावर विरोधकांकडून टीकाही करण्यात आली होती. या टीकेला आता विजयानंतर सिद्धी यांनी प्रतिक्रिया देताना कामातून उत्तर देऊ असं म्हटलंय.

सिद्धी वस्त्रे म्हणाल्या की, आज मला सर्वांनी जी संधी दिली त्यासाठी आम्ही मोठा विजयोत्सव करतोय. माझ्यावर ज्यांनी टीका केली त्यांच्या टीकेवर मात म्हणजे आमचा विजय आहे. याचा आम्हाला मोठा आनंद झाला आहे. यापुढे समाजासाठी काम करायचं असून पक्ष वगैरे न बघता आम्ही कामं करू. जनतेचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देऊ.

मोहोळमध्ये अनेक मोठ्या सभा झाल्या. त्या सभांमध्ये विरोधकांकडून टीकाही केली गेली. या टीकेबद्दल बोलताना सिद्धी वस्त्रे यांनी म्हटलं की, आमचं जे काही उत्तर आहे ते कामातूनच देऊ. आमचं काम हेच टीका करणाऱ्यांसाठी उत्तर असणार आहे.

नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ ब व प्रभाग क्रमांक ५ अ या दोन जागांसाठी शनिवारी मतदान झाले. दोन प्रभागात मिळून एकूण ५ हजार २१७ मतदार होते. त्यापैकी ३४९५ मतदारांनी मतदान केले. एकूण ६६.९९ टक्के मतदान झाले. यापूर्वी २ डिसेंबरला मोहोळ नगर परिषदेच्या १८ जागांसाठी निवडणूक झाली होती.

प्रभाग क्रमांक ३ ब व प्रभाग क्रमांक ५ अ या दोन जागांची निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुढे गेल्याने २० डिसेंबर रोजी घेण्यात आली. प्रभाग क्रमांक ३ ब मध्ये एकूण २७०६ मतदान होते. त्यापैकी १९०८ इतके मतदान झाले होते. तर प्रभाग क्रमांक ५ अ मध्ये २५११ इतके मतदान होते. त्यापैकी १५८७ इतके मतदान झाले. दोन्ही प्रभागांमध्ये अत्यंत चुरशीने मतदान झाले होते.

Reactions

Post a Comment

0 Comments