अकलूज नगरपरिषदेच्या निवडणूक महासंग्रामात तुतारी वाजली
अकलूज (कटूसत्य वृत्त):- शंभू महादेवाच्या सानिध्यात, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या माळशिरस तालुक्यातील अकलूज नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक, नुकतीच वाजत गाजत आणि आरोप प्रत्यारोच्या चक्री वादळात पार पडली. प्रसंगी निवडणुकीच्या रणांगणात, एका बाजूला सत्ताधीश कमळ डोलत होते तर एका बाजूला तुतारीच्या सुमधुर आवाजात केलेली विकास कामे बोलत होते,म्हणूनच अकलूजच्या जनतेने मोहिते पाटील यांच्या बाजूने कौल देत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या रेश्मा लालासाहेब अडगळे यांनी 12329 मते मिळवत भाजप उमेदवार पूजा कोतमिरे यांचा पराभव केला. चुरशीच्या लढतीत भाजपने 4 जागा जिंकल्या तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने नगराध्यक्ष व 22 जागा जिंकत अकलूज नगरपरिषदेवर विजयाचा झेंडा फडकवला.यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या 2 उमेदवारांचा समावेश आहे.
*चौकट*
अकलूज नगरपरिषदेसाठी भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार,या तीन पक्षामध्ये मुख्य लढत होती. 2 डिसेंबर रोजी 34 हजार 408 मतदरापैकी 23 हजार 817 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.12 हजार 161पुरुष व 11हजार 650 महिला मतदारांनी 13 प्रभागातील 39 बुथवर 69.22 टक्के मतदान केले होते.
*चौकट*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) प्रचार सभेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,जयसिंह मोहिते पाटील यांचा सहभाग महत्वाचा ठरला तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील व शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी विकास मुद्द्यांवर प्रचार सभा गाजवली.

0 Comments