पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- आंतराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल ग्रीन वर्ल्ड को-प्राईड पुरस्कार आपल्या दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूरला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील, सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या शुभहस्ते प्रदान करणेत आला, शतकोत्तर वाटचाल करीत असलेल्या आपल्या बँकेस ही सन्मानाची बाब असल्याचेही बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी यावेळी नमूद केले.
ग्रीन वर्ल्ड व कॉसमॉस को-ऑप.बँक लिमीटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार मंथन 2025 हा कार्यक्रम सहकार सभागृह, कॉसमॉस टॉवर, शिवाजी नगर, पुणे येथे संपन्न झाला. हा पुरस्कार बँकेचे वतीने संचालक पांडुरंग घंटी, गणेश शिंगण, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे व व्यवस्थापक गणेश हरिदास, योगेश जगताप यांनी स्विकारला अशी माहिती बँकेचे चेअरमन सतीशजी मुळे यांनी दिली. सध्या बँकेने गृह व वाहन कर्जा बरोबरच महाराष्ट्र शासनाच्या आण्णासाहेब पाटील, वसंतराव नाईक, आई अशा विविध व्याज परतावा योजनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून कर्ज पुरवठा करीत आहे, त्याचा फायदा व्यवसाय वृध्दीसाठी घ्यावा असे आवाहन यावेळी मुळे यांनी केले.
सदर कार्यक्रमास महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात काम करीत असणाऱ्या बहुसंख्य बँकांचा समावेश होता. महाराष्ट्र सहकारी बँकेचे प्रशासक श्री.विद्याधर अनास्कर, कॉसमॉस बँकेचे सीए मिलींदजी काळे, ग्रीन वर्ल्डचे गौतम कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

0 Comments