दारू नव्हे दूध प्या, उमेद फाउंडेशनच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- ३१ डिसेंबर रोजी अनेक तरुण नववर्षाचे स्वागत मद्य प्राशन करून डीजेच्या तालावर धांगडधिंगा घालून साजरा करतात मात्र पिंपरी तालुका माळशिरस येथील श्री क्षेत्र भोजलिंग देवस्थान ट्रस्ट राणेवाडी, उमेद फाउंडेशन,पिंपरी व आम्ही पिंपरीकर या सामाजिक संघटनेच्या वतीने नववर्षाच्या स्वागता निमित्त ३१ डिसेंबर थर्टी फर्स्ट रोजी दारू नव्हे दूध प्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती संयोजक समितीचे मा.सरपंच नानासाहेब राणे यांनी माहिती देताना सांगितले. यावेळी ते पुढे माहिती देत असताना म्हणाली की,
मागील गेले ११ वर्षापासून आम्ही हा उपक्रम घेत आहोत. या उपक्रमामध्ये एकत्र आलेले सर्व युवक यांना ज्येष्ठ नागरिक विविध अधिकारी,पदाधिकारी यांच्याकडून व्यसनापासून होणारे दुष्परिणाम कुटुंबाचे विस्कळीतपणा यासाठी व्यसनापासून दूर राहण्याबाबत प्रबोधन केले जात असल्याचेही पिंपरी गावचे माजी सरपंच नानासाहेब राणे यांनी सांगितले. सदर घेत असलेल्या कार्यक्रमामुळे अनेक युवक व्यसनापासून परावृत्त झाले आहेत पिंपरी गावातील या घेण्यात आलेल्या उपक्रमामुळे अनेक परिसरात हा उपक्रम सामाजिक संघटनेने सुरू केला आहे.

0 Comments