सिद्धेश्वर जत्रेच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या तारखे मध्ये बदल करा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निवडणूक आयोगाने राज्यातील महानगर पालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून सोलापूर शहरात 13, 14, 15 तारखेला सोलापूर चे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरची जत्रा मोठ्या प्रमाणात साजरी होत असते या जत्रेच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक दोन दिवस पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी छत्रपती ब्रिगेडच्या वतीने निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडे ई-मेल द्वारे व मा. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
यावेळी मुख्य निवडणूक आयोगाने छत्रपती ब्रिगेडच्या ईमेल ची दखल घेऊन तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल मागितला आहे. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी छत्रपती ब्रिगेडच्या शिष्टमंडळांना दिली.
महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे पण
१३, १४ व १५ जानेवारी दरम्यान श्री सिद्धेश्वर महाराज जत्रा संपन्न होत असते.
ही जत्रा केवळ उत्सव नसून लाखो भाविकांची श्रद्धा, परंपरा आणि आस्था यांचे प्रतीक आहे.
अशा पवित्र आणि गर्दीच्या काळात १५ जानेवारी रोजी मतदान ठेवणे योग्य वाटत नाही.
जत्रा चालू असल्यामुळे अनेक नागरिक जत्रा व्यवस्थेत व्यस्त असतात.
यामुळे मतदानाचा टक्का कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.लोकशाही मजबूत होण्यासाठी जनतेच्या भावनांचा आदर आवश्यक आहे.
लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
परंतु सण, जत्रा आणि धार्मिक परंपरांचा आदर राखला गेला नाही तर हा सहभाग कमी होऊ शकतो.
तरी प्रशासन व निवडणूक आयोगाने याबाबत लोकभावनेचा फेरविचार करून सोलापूर महानगरपालिका मतदानाची तारीख बदलावी अशी मागणी करण्यात आली आहे.
छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक श्याम कदम जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके मुख्य समन्वयक अँड विकास तीरेकर जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा कोळी शहर कार्याध्यक्ष सोनाली सगर संपर्कप्रमुख इस्माईल मकानदार सतीश आलेगाव गणेश माने रफिक रचभरे बसवराज आळंगे जैनुद्दीन नदाफ अनिल गवंडी प्रवीण सोमवंशी संकेत कुलकर्णी विकास बचुटे ज्ञानेश्वर पवार सचिन होनमारे शहीद सय्यद आदी उपस्थित होते.
.png)
0 Comments