मनोरमा बँकेचा कारभार आदर्शवत- पाटील
वैराग येथे दहाव्या शाखेचा थाटात शुभारंभ
वैराग (कटूसत्य वृत्त):- मनोरमा बँक ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून, सहकार क्षेत्रातील विश्वास, शिस्त आणि आधुनिकतेचे उत्तम उदाहरण आहे. बँकेचा कारभार आदर्शवत आहे. बॅंकिंग सहकार क्षेत्रातील आधुनिक, पारदर्शक व लोकाभिमुख मॉडेल म्हणून मनोरमा राज्यात गौरव प्राप्त ठरत असून, येत्या काळात देशपातळीवर या बँकेच्या कार्याची दखल घेतली जाईल ,असे गौरवोद्गार माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
मनोरमा बँकेच्या वैराग येथील दहाव्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मनोरमा बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे हे होते.यावेळी माजी सहकार आयुक्त सुनील पवार, माजी आमदार राजन पाटील ,दिलीप माने यांच्या हस्ते या शाखेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभाताई मोरे, कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन ॲड. सुरेश गायकवाड, मनोरमा परिवाराचे ब्रँड अँबेसिडर डॉ. सुमित मोरे, डॉ. मिताली मोरे, निरंजन भूमकर, जिल्हा लेखापरीक्षक व्ही. व्ही. डोके, सतीश पोकळे, कृष्णराज बारबोले, संचालक डॉ. पी. बी. रोंगे, कदम, संतोष मोटे, सत्यजित वाघचौरे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा कुलकर्णी, कविता कुलकर्णी, डॉ. विश्वास मोरे, कल्याण शिंदे, रत्नप्रभा गायकवाड, ॲड. विश्वास देवकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रास्ताविकात बँकेच्या कार्याध्यक्षा अस्मिता गायकवाड यांनी मनोरमा बँकेच्या प्रगतीचा आढावा मांडत बँकेच्या विस्तारामागील उद्दिष्टे स्पष्ट केला
यावेळी उद्घाटक माजी सहकार आयुक्त सुनील पवार, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, लेखापरीक्षक व्ही. व्ही. डोके व सतीश पोकळे यांनीही आपल्या भाषणात चेअरमन श्रीकांत मोरे व संचालक मंडळाच्या कार्यशैलीचे कौतुक करून बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक डॉ. सुमित मोरे, मल्टीस्टेट चेअरमन शोभाताई मोरे व रत्नप्रभा गायकवाड यांनीही आपले विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी मनोरमा बँकेच्या वाटचालीचा आढावा घेत सर्वांच्या सहकार्यामुळे ही वाटचाल सुरू असल्याचे सांगतउपस्थित सर्व मान्यवर, सभासद, ठेवीदार व नागरिकांचे आभार मानून बँकेच्या प्रगतीसाठी सर्वांच्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले.
आभार संचालक डॉ. पी. बी. रोंगे यांनी मानले. सूत्रसंचालन पल्लवी पवार यांनी केले. कार्यक्रमानंतर पंचक्रोशीतील प्रगतशील बागायतदार शेतकरी सभासद, व्यापारी, ठेवीदार व हितचिंतक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
.png)
0 Comments