Hot Posts

6/recent/ticker-posts

बार्शी नगरपरिषदेवर महायुतीचा झेंडा!

 बार्शी नगरपरिषदेवर महायुतीचा झेंडा!

बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शीनगरपरिषदेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत अखेर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने 23 जागा जिंकत सत्ता कायम राखली.

तर विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्या गटाने 19 जागा जिंकून चांगलीच लढत दिली.
नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या तेजस्विनी कथले यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या निर्मला बारबोले यांचा 4,688 मतांनी पराभव करत नगराध्यक्षपद काबीज केले.

शासकीय धान्य गोदाम येथे 21 प्रभागांतील 42 नगरसेवक तसेच थेट नगराध्यक्षपदासाठी रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली. 12 टेबलांवर 11 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडली. सर्व प्रभागांचे निकाल निवडणूक निर्णय अधिकारी अमोल सिंह भोसले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तैमूर मुलाणी आणि राज्य निवडणूक निरीक्षक विक्रमसिंह देशमुख यांनी जाहीर केले.

सुरुवातीपासूनच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. मात्र विद्यमान नगरसेवक ॲड. महेश जगताप आणि रोहित लाकाळ यांना पराभवाचा सामना करावा लागला.

बार्शी शहरातील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये माजी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी 863 मतांच्या फरकाने एकतर्फी विजय मिळवला. तर प्रभाग 19 मध्ये भाजपचे भारत पवार यांना केवळ 7 मतांनी निसटता विजय मिळाला. प्रभाग 7 मध्ये भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार संदेश काकडे यांनी सुमारे 2,500 मतांच्या सर्वाधिक फरकाने विजय मिळवत आपली जागा कायम राखली. दरम्यान, प्रभाग 7 मधून युतीच्या उमेदवार मीरा नाळे या यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या.

थेट नगराध्यक्षपदासाठी शहरातील सर्व 21 प्रभागांतील मतदान केंद्रांमधून भाजपच्या तेजस्विनी कथले यांना एकूण 35,879 मते, तर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या निर्मला बारबोले यांना 31,191 मते मिळाली. कथले यांनी बारबोले यांचा 4,688 मतांनी पराभव केला.

Reactions

Post a Comment

0 Comments