राज्यस्तरीय करुणाशील पुरस्कारांनी परिचारिकांचा सन्मान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मानवतेच्या दृष्टिकोनातून रुग्णसेवा करणाऱ्या महाराष्ट राज्यातील परिचारिका आणि अधिसेविकांना राज्यस्तरीय करुणाशील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. करुणाशील बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आशुतोष नाटकर यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे व प्रमुख उपस्थिती
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या प्रबंधक व अधिक्षिका सुश्रुषा सेवा (मुंबई) अर्चना बढे, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.नसीम पठाण, जी. एम. मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या शुभ हस्ते
नर्स एज्युकेटरच्या सेवानिवृत्त प्राचार्या डॉ. सरोज उपासनी आणि डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या निवृत्त प्राचार्या डॉ. स्वाती वीरेश्वर कांबळी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, बुके आणि भारतीय संविधानाची प्रत असे होते. पुरस्काराचे यंदा २३ वर्ष आहे. कोरोना काळ वगळता हा पुरस्कार सोहळा अखंड सुरूच आहे.
वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांची जेवढी भूमिका महत्त्वाची आहे तेवढीच परिचय का परिचारिकांची आहे त्यांच्याशिवाय डॉक्टरांचे काम अधुरे आहे असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे यांनी व्यक्त केले. सोनूबाई आवटे व करुणशील बहुउद्देशी सामाजिक संस्था करून समितीचे सोलापूर यांच्यावतीने राज्यातील १६ परिचारिकांना करुणाशील तर दोघींना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून डॉ.वर्षा डोईफोडे बोलत होत्या शिवस्मारक सभागृहात शनिवारी सायंकाळी हा सोहळा पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डाॅ.नशिमा पठाण मल्लिकार्जुन पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. दुसऱ्यांना आनंद देण्याचे काम परिचय करतात रुग्ण दाखवण्यात येतो तेव्हा त्यांच्या उपचार करतात काळजी घेतात निस्वार्थी सेवा म्हणजे वैद्यकीय सेवा आहे असे मत डॉ .नशिमा पठाण यांनी मांडले २३ वर्षापासून करुणाशी पुरस्कार देण्यात येत आहे त्यात सातत्य ठेवले आहे हा पुरस्कार आता राज्यस्तरावर गेला असून तो जागतिक स्तरावर जाईल असे मत निवृत्त परिचारिका नशीमा शेख यांनी आपल्या मनोगत मांडले जीवन गौरव पुरस्कार विजेते डॉ.सरोज उपासनी यांनी विविध विषयावर मत मांडले यावेळी डॉ.सौ. स्वाती कांबळी याने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी परिचारिका व्यवसायामध्ये एकाच कुटुंबातील एकूण आठ सदस्य नर्सेस क्षेत्रात ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे कार्यरत असलेले पापानी यांचा करुणाशील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी कवी मारुती कटकधोंड यांच्या हस्ते परिचारिकांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भैरवनाथ कानडे यांनी व आभार डॉ. राजीव मोहोळकर यांनी केले.
.png)
0 Comments