दोन ठाकरे, एक विचार; युतीने राजकारणात खळबळ
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- मराठी राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडली असून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन झाले आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली असून या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी आशा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापुरातील सोन्या मारुती गणपती मंदिरात गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मनसैनिक व शिवसैनिकांनी फटाके फोडत जल्लोष केला तसेच घोषणाबाजी करत मराठी ऐक्याचा जयघोष केला. दोन भाऊ एकत्र येणे म्हणजे मराठी माणसाच्या ऐक्याची वज्रमूठ असल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
ठाकरे बंधूंच्या या एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल आणि मराठी अस्मितेला बळ मिळेल, असा विश्वास यावेळी नेते व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने ही युती महत्त्वाची ठरणार असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, मनसे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी, शहरप्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, मनसे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहर अध्यक्ष जैनोद्दीन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, मनविसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोष घोडके यांच्यासह जितेंद्र टेंभुर्णीकर, सुभाष माने, विजय पुकाळे, पवन देसाई, बाळासाहेब गायकवाड, आबा सावंत, सुरेश जगताप, गणेश पाटील, गोविंद बंदपट्टे, बंटी बेलमकर, वैभव रंपुरे, अनिकेत उपासे, समर्थ माळगे, अभी इरकल, सैपन जामखंडी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व मनसैनिक उपस्थित होते.

0 Comments