Hot Posts

6/recent/ticker-posts

आबांचे पथ्य मोडले, पक्षाला फटका बसला:- आ. देशमुख”

 आबांचे पथ्य मोडले, पक्षाला फटका बसला:- आ. देशमुख”






सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- आबांनी आयुष्यभर पाळलेले राजकीय पथ्य न पाळल्यामुळेच नगरपालिका निवडणुकीत पक्षाला पराभव स्वीकारावा लागला, अशी स्पष्ट कबुली आमदार बाबासाहेब देशमुख यांनी दिली. बुधवारी (दि. २४) ते जिल्हा परिषदेत आले असता पत्रकारांशी बोलत होते.

आ. देशमुख म्हणाले की, आबांनी शेवटपर्यंत भाजपसोबत न जाण्याचा निर्णय ठामपणे पाळला होता. मात्र काही कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे नगरपालिका निवडणुकीत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा निर्णय जनतेला रुचला नाही आणि त्याचा मोठा फटका पक्षाला बसला. त्यामुळेच नगरपालिका निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.

या पराभवातून बोध घेत पुढील येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत वेगळा विचार करावा लागणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. पक्ष जिवंत ठेवण्यासाठी आबांनी नेहमीच कार्यकर्त्यांना जपले. त्याच कार्यकर्त्यांच्या बळावर आपण आमदार झालो असून आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, असे आ. देशमुख यांनी सांगितले.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.


प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागणा.तालुक्यातील अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विविध कामे जिल्हा परिषदेत प्रलंबित आहेत. ही कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेतल्याचे आ. देशमुख यांनी सांगितले. सीईओ जंगम यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद (ग्रीन सिग्नल) मिळाल्यामुळे ही प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Reactions

Post a Comment

0 Comments