सोलापूर शहर हद्दीमध्ये ३७ (३) जिल्ह्यात मनाई आदेश लागू
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):-विविध स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शांतता व सार्वजनिक सुख्ययब्धा भंग होण्याची शक्यता आहे आणि मानवी जीवन आणि मालमत्तेचे नुकसान यास गंभीर धोका आहे. पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांच्या नियंत्रणाखालील भागात सार्वजनिक शांतता बिघडवणे आणि मानवी जिवीतास धोका आणि मालमत्तेची हानी आणि कोणत्याही प्रकारची दंगल रोखण्यासाठी पाच किंवा अधिक व्यक्तींच्या हालचाली आणि बेकायदेशीर एकत्र येण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे हिताचे मानले जाते. त्याअनुषंगाने पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा) सोलापूर शहर डॉ. अश्विनी पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ मधील पोटकलम (३) अन्वये दिनांक ११/१२/२०२५ रोजी ००:०१ वाजले पासून ते दिनांक २५/१२/२०२५ रोजीचे मध्यरात्री २४:०० वाजेपर्यंत १५ दिवसांसाठी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्दीत खालील प्रतिबंध लागु करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संम्मेलनास प्रतिबंध , कोणत्याही व्यक्तीची कोणतीही मिरवणूक आणि कोणत्याही मिरवणूकीत लाऊडस्पिकर, वाद्ये, वाद्य बँड आणि फटाके फोडण्याचा कोणताही वापर आदेशात समाविष्ट असलेल्या मनाईसाठी खालीलप्रमाणे सुट देण्यात आली आहे.
सर्व प्रकारचे विवाह समारंभ इ. अत्यसंस्कार, सभा, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संघटनाची कायदेशीर बैठका, कंपन्या, क्लब, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संघटनाची कायदेशीर बैठका. सामाजिक मेळावे आणि क्लब सहकारी संस्था इतर सोसायट्या आणि संघटना यांचे सामान्य व्यवहार करण्यासाठी त्यांची बैठक, चित्रपटगृहे, नाटकगृहे किंवा सार्वजनिक करमणूकीच्या कोणत्याही ठिकाणी किंवा त्याभोवती चित्रपट नाटक किंवा कार्यक्रम पाहण्याच्या उद्देशाने संमेलने सरकारी किंवा निम सरकारी कार्य पार पाडण्यासाठी सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाची कायदे न्यायालये किंवा कार्यालयामध्ये किंवा त्याभोवती लोकांचे संमेलन शैक्षणिक उपक्रमासाठी शाळा, महाविदयालये आणि इतर शैक्षणिक संस्थामध्ये किंवा त्यांच्या आसपास संमेलने , कारखाने, दुकाने आणि आस्थापनामध्ये सामान्य व्यापार, व्यवसाय आणि आवाहनायाठी संमेलने अशा इतर संमेलने आणि मिरवणूकीत ज्याना विभागीय पोलीस उप आयुक्त सोलापूर शहर आणि त्यांचे पर्यवेक्षक अधिकारी यांनी परवानगी दिली आहे.

0 Comments