मराठा सेवा संघ व ३३ कक्षांची समन्वय बैठक सांगलीत उत्साहात
सांगली (कटूसत्य वृत्त):- मराठा सेवा संघ आणि ३३ कक्षांची महत्त्वपूर्ण समन्वय बैठक संभाजी ब्रिगेडचे महासचिव शिवश्री सौरभ दादा खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सांगली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. संघटनांच्या कामकाजातील एकसूत्रता, आगामी उपक्रमांची आखणी, तसेच संघटनात्मक बळकटी याबाबत सखोल चर्चा या बैठकीत झाली.
या बैठकीत प्रदेश संघटक मनोजकुमार गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन जगताप, उद्योजक कक्ष अध्यक्ष राजेंद्र पाटील, मराठा सेवा संघ सांगली जिल्हाध्यक्ष आर. एस. पवार, संभाजी ब्रिगेड सांगली जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे, जिजाऊ ब्रिगेड विभागीय उपाध्यक्ष शितल मोरे, डॉ. संजय पाटील, जिजाऊ ब्रिगेड सांगली जिल्हाध्यक्ष प्रणिताताई पवार, जिल्हा सचिव गणेश सव्वासे, कृषी परिषद प्रदेश कार्याध्यक्ष प्रतापसिंह मोहीते यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती विशेष ठरली. याशिवाय ३३ कक्षांच्या विविध विभागांतील पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी राबवायच्या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. सध्याच्या सामाजिक व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संघटनांची एकसंघ भूमिका काय असावी, यावरही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
महासचिव सौरभ दादा खेडेकर यांनी सर्व कक्षांनी समन्वय वाढवून व्यापक पातळीवर काम करण्याचे आवाहन केले. मराठा समाजाच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याची आणि तरुणाईला संघटनांमध्ये सक्रिय करून आगामी उपक्रमांमध्ये अधिक प्रभावी सहभाग मिळवून देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे बैठक अत्यंत यशस्वी ठरली असून पुढील काळात मराठा सेवा संघ आणि ३३ कक्षांचे काम आणखी जोमाने वाढेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.



0 Comments