Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरस्कार वितरणाने मनोरमा साहित्य संमेलनाची सांगता

 पुरस्कार वितरणाने मनोरमा साहित्य संमेलनाची सांगता




सामंत यांना जीवनगौरव तर जोशी यांना काव्यरत्न पुरस्कार 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठी साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या मनोरमा राज्यस्तरीय साहित्य संमेलनाची सांगता राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरणाने झाली.
गुरुवारी, हॉटेल बालाजी सरोवर येथील सदाशिवराव मोरे सभागृहात ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. मनोरमा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी मनोरमा बैंक राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार गोव्याचे प्रसिध्द साहित्यिक अनिल सामंत यांना देण्यात आला. तसेच मनोरमा बँक राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार प्रसिध्द कवी वैभव जोशी यांना प्रदान करण्यात आला. प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
याशिवाय मनोरमा मल्टीस्टेट पुरस्कृत मनोरमा राज्यस्तरीय साहित्य सेवा पुरस्कार डॉ. मनीषा अतुल (नागपूर), डॉ. अपूर्वा जोशी (पुणे), संदीप काळे (पुणे), डॉ. शिवाजी शिंदे (सोलापूर) यांना देण्यात आला. तसेच स.रा. मोरे ग्रंथालयातर्फे जाहीर झालेला मनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार साहित्य समीक्षक नीलकंठ कदम (मुंबई) प्रसिद्ध निवेदिका शिल्पा देशपांडे (पुणे), अंजली करंजकर (पुणे) आणि सुनील साळुंखे (सोलापूर), संदीप सांगळे यांना प्रदान करण्यात आला. प्रत्येकी दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी शिल्पा देशपांडे, अपूर्वा जोशी, अंजली करंजकर, संदीप काळे यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या संमेलनात पालकमंत्री जयकुमार गोरे भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, शिवाजीराव काळंगे, शोभा कालुंगे, डॉ. बी. पी. रोंगे, डॉ. विश्वास मोरे, संजय फडके, सचिन गायकवाड, राजेंद्र पवार, व्यंकटेश कुलकर्णी, कैलास वावळे, सुरेश शहापूरकर, अभिजित वाघचौरे, सत्यजित वाघचौरे, अँड. बाबासाहेब जाधव, नागेश पवार, निवेदक अभिराम सराफ, पल्लवी पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
दरम्यान सकाळी ज्येष्ठ साहित्यिक पानीपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते मनोरमा साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी विश्वास पाटील यांची मुलाखत निवेदिका अश्विनी कोळेकर, शोभा मोरे, अस्मिता गायकवाड, संतोष सुरवसे यांनी घेतली. संमेलनाचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांची प्रकट मुलाखत मुंबई दूरदर्शनचे निवृत्त अधिकारी जय भाटकर, प्रसिध्द निवेदिका शिल्पा देशपांडे आणि
कोळेकर यांनी घेतली. दोन्ही विषयक वाटचाल सांगीतली. श्रीकांत मोरे यांच्या काही कविता गायक नागेश पवार यांनी सादर केल्या.
दुपारच्या सत्रात 'मराठी भाषा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर या विषयावर डॉ. राजशेखर शिंदे यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, माजी शिक्षण उपसंचालक प्रदीप मोरे यांनी आपले विचार मांडले. प्रसिध्द वात्रटिकाकार रामदास फुटाणे
यांनी 'सामना चित्रपट पन्नास वर्षांपूर्वी व आता या विषयावर एक आगळावेगळा कार्यक्रम सादर केला. इंद्रजित घुले यांनी फुटाणे यांच्याशी संवाद साधला.
अखेरच्या सत्रात तणावविरहित जीवनशैली' या विषयावर मृणालिनी मोरे, डॉ. तनुजा चिकने मालवंडी, डॉ.
संदीप तांबारे, कविता अंधारे, संतोषी सुतार यांनी व्याख्यान दिले. या संमेलनासाठी डॉ. मिताली मोरे, डॉ. ऋचा मोरे, शिल्पा कुलकर्णी, डॉ. राजशेखर शिंदे, पद्माकर कुलकर्णी, कल्याण शिंदे, अॅड. सुरेश गायकवाड, सुनील पाटील, शिवशंकर सावंत यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले.


चौकट  
'पंचतारांकित' संमेलन
मनोरमा साहित्य संमेलन यंदा हॉटेल बालाजी सरोवर येथे
आयोजित केले होते. आलेल्या पाहुण्यांची उत्तम बडदास्त
ठेवण्यात आली होती. उपस्थित साहित्य रसिकांनाही मेजवानी देण्यात आली. याचा उल्लेख अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पंचतारांकित संमेलन असा केला. मराठी साहित्यात नेहमी गरीबीचे आणि दारिद्र्याचेच वर्णन केले जाते. मराठी साहित्य संमेलन अलिशान पंचतारांकित
हॉटेलमध्ये होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मनोरमा परिवाराने ऐश्वर्यसंपन्न संमेलन करून दाखवले, असे ते म्हणाले.

Reactions

Post a Comment

0 Comments