संदीप पालके यांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड
क. तडवळे (कटूसत्य वृत्त):- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी विविध 42 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या स्पर्धा तालुका, विभाग व राज्यस्तरावर होणार आहेत.दि. 28 नोव्हेंबर रोजी धाराशिव तालुक्यातील तालुकास्तरीय शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा जिल्हा परिषद कन्या प्रशाला, धाराशिव याठिकाणी पार पडली. या स्पर्धेत *जयहिंद विद्यालय, क. तडवळे येथील सहशिक्षक संदिप तुळशीदास पालके यांनी इ. 6 वीतील गणित विषयातील कोन या घटकावर शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती केली होती. त्यांच्या या शैक्षणिक व्हिडीओचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आला आहे आणि त्यांची लातूर या ठिकाणी होणाऱ्या विभागस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी. वाय. यादव,उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे, संस्थेचे जनरल सेक्रेटरी पी.टी.पाटील,शा. व्य. समितीचे चेअरमन टी. पी.शिनगारे, शिक्षणविस्ताराधिकारी श्रीमती किशोरी जोशी,केंद्रप्रमुख जगदीश जाकते,विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती
या सर्वांनी कौतुक केले.

0 Comments