Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळच्या शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शहरवासीयांनी भाजप सोबत रहावे

 मोहोळच्या शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शहरवासीयांनी भाजप सोबत रहावे




माजी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांचे आवाहन

नगराध्यक्षपदाच्या शीतल क्षीरसागर यांच्यासह सर्व भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मोहोळ येथे सभा संपन्न

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
     भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्वसामान्य जनतेसाठी काम करत आहे.मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार शीतल सुशील क्षीरसागर यांना व २० नगरसेवकांना निवडून द्या.  येणाऱ्या काळामध्ये मोहोळ शहरातील  सर्वसामान्य जनतेच्या सर्व मूलभूत गरजा  अपेक्षा भाजपा पूर्ण करेल.केंद्रात व राज्यात आमचे सरकार आहे.विरोधी आमदाराला निधी मिळत नसल्याने मोहोळचा विकास खुंटला आहे.त्यामुळे भाजपाच्या पाठीशी मोहोळकरांनी उभे राहावे असे आवाहन माजी खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज यांनी केले.
          मोहोळ येथे मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा च्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर व २० नगरसेवक यांच्या प्रचारार्थ  ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज मंदिरामध्ये संकष्ट हरणी पारायण ला भेट दिली. यावेळी नागनाथ देवस्थानचे मानकरी राजेंद्र खर्गे  महाराज, अरुण बुवा मोहोळकर, नागनाथ देवस्थानाचे माजी अध्यक्ष सुरेश घोंगडे यांची भेट घेतली.तदनंतर  प्रभाग क्रमांक सात मध्ये येऊन भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष सह सर्व उमेदवार यांच्या समवेत  होम टू होम मतदारांच्या भेटी घेतल्या त्या प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितल क्षीरसागर या उच्चशिक्षित व  सुशिक्षित आहेत. मोहोळच्या  विकासासाठी व्हिजन असणाऱ्या आणि समाजकारणातील वारसा असलेल्या आहेत. अश्या सुशिक्षित व्यक्तीकडून मोहोळ शहराचा विकास करून घ्यावा. कारण  केंद्रात नरेंद्र मोदी व  राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे  सरकार आहे. आणि सोलापूर जिल्ह्यातील पालकमंत्री जयकुमार  गोरे व  राजन पाटील  तालुक्यातील ज्येष्ठ नेते यांच्या नेतृत्वात आम्ही आपली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.यावेळी   दत्तात्रय कारंजकर, सिद्धेश्वर म्हमाने, विनोद विरपे, दत्तात्रय नाईक, ओंकार बरे, सोमनाथ बरे,श्रेयश निचळ आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

 चौकट .......

 क्षीरसागर कुटुंबाचे मोठं योगदान,ते नगराध्यक्ष पदाचे खरे दावेदार ' 

 आजपर्यंत मोहोळ शहरासाठी दुष्काळातील टँकरने पाणी वाटप असेल , अथवा कोरोना काळातील महाभयंकर परस्थिती असेल, किंवा सर्व सामान्य जनतेचे प्रश्न असतील , आशा संकटकाळात सोमेश क्षीरसागर, सुशील क्षीरसागर  यांचे सामाजिक कार्य खूप मोठे आहे.कोरोना काळात अत्यंत बिकट व वाईट परिस्थितीत क्षीरसागर कुटुंबाने सामूहिक सर्वांसाठी किचन उपलब्द करून मोफत जेवणाची सोय केली होती. समाजकारणासाठी व जनतेच्या सेवेसाठी यांचे  खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे क्षीरसागर कुटुंब  निश्चितच नगराध्यक्ष  पदासाठीचे  दावेदार आहेत. मोहोळकरांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे.
--- डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज.

  चौकट ...

' मोहोळच्या विकासासाठी भाजपा च्या पाठीशी उभे रहा ' 

 आपण मागील  एक वर्ष झाले पाहत आहात की, विरोधकांकडे सत्ता नसल्याकारणाने निधी त्यांच्याकडे येत नाही.त्यामुळे  ते विकास करू शकणार नाहीत. आणि फक्त बोलून विकास होत नाही. व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटत नाहीत .त्यामुळे केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे, आपल्याला विकास करायचा आहे. म्हणून तुम्ही भाजपा च्या पाठीशी उभे रहा.
-शीतलताई क्षीरसागर , लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार
Reactions

Post a Comment

0 Comments