Hot Posts

6/recent/ticker-posts

ईच्छा‎ भगवंताची परिवाराकडून अण्णा‎ बनसोडे यांचा सन्मान

 ईच्छा‎ भगवंताची परिवाराकडून अण्णा‎ बनसोडे यांचा सन्मान



नागपूर (कटूसत्य वृत्त):- ‘ईच्छा‎ भगवंताची’ परिवाराकडून‎ अण्णा बनसोडे यांचा‎ सन्मान नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या‎ पार्श्वभूमीवर‎ सोलापुरातील पाणीपुरवठा,‎ रोजगार,‎ औद्योगिक वाढ व पायाभूत सुविधा‎ यांसारख्या प्रमुख प्रश्नांवर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन विधानसभेचे उपाध्यक्ष‎ व सोलापूर जिल्ह्याचे‎ सहसंपर्क मंत्री अण्णा‎ बनसोडे यांनी केले. या बैठकीस‎ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे‎ संतोष भाऊ‎ पवार,‎ जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष‎ किसन‎ जाधव, ज्येष्ठ‎ नेते तौफिक‎ शेख,‎ माजी नगरसेवक‎ आनंद चंदनशिवे,‎ गणेश‎ पुजारी, आनंद मुस्तारे, प्रमोद भोसले, प्रदेश‎ सचिव इरफान शेख, सलीम पामा, तुषार जक्का, अनिल‎ बनसोडे,‎ शबाज‎ किंग,रुपेश‎ भोसले,वैभव‎ गंगणे,हुलगप्पा शासम,आनंद‎ गाडेकर यांच्यासह मनपा व‎ जिल्हा प्रशासन तसेच‎ पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी‎ तसेच सोलापुरातील पत्रकार‎ बांधव‎ उपस्थित होते. शहराच्या समस्यांवर सखोल चर्चा‎ होऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजनांचे निर्देश अण्णा‎ बनसोडे‎ यांनी‎ दिले. सोलापूरच्या तीन दिवसीय दौऱ्यात पाहिलेल्या समस्या‎ आणि‎ नागरिकांच्या अपेक्षांच्या आधारे त्यांनी‎ सर्वांगीण विकासाची‎ भूमिकाही‎ स्पष्ट‎ केली. या‎ पार्श्वभूमीवर किसन‎ जाधव‎ यांनी ‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराच्या‎ वतीने‎ अण्णा बनसोडे यांचा विशेष‎ सन्मान केला.‎ तथागत गौतम बुद्ध,‎ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, उपमुख्यमंत्री‎ अजित पवार, खासदार सुनील‎ तटकरे आणि‎ अण्णा‎ बनसोडे यांची‎ छायाचित्र‎ असलेले‎ एकत्र प्रतिमा असलेली फ्रेम देऊन‎ त्यांना गौरवण्यात आले. किसन‎ जाधव‎ यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवडच्या‎ धर्तीवर‎ सोलापूरचा‎ विकास‎ करण्याचा‎ अण्णा‎ बनसोडे यांचा‎ मानस‎ शहरासाठी‎ आश्वासक असून त्यांच्या विकासदृष्टिकोनाला पूर्ण पाठिंबा‎ देऊ. सोलापूरच्या सर्वांगीण‎ प्रगतीसाठी‎ ही‎ बैठक‎ आणि‎ दिलेला‎ सन्मान महत्त्वाचा‎ टप्पा ठरल्याचे उपस्थितांनी नमूद‎ केले.

Reactions

Post a Comment

0 Comments