Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री विठ्ठल कारखान्यावर ऊस तोडणी मजूरासाठी मोफत सर्वरोग निदान शिबीर

 श्री विठ्ठल कारखान्यावर ऊस तोडणी मजूरासाठी मोफत सर्वरोग निदान शिबीर




वेणुनगर (कटूसत्य वृत्त):- वेणुनगर - गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारखाना कार्यस्थळावर साखर आयुक्त,महाराष्ट्र राज्य यांचे परिपत्रक अन्वये ऊस तोडणी मजूरांना संपूर्ण हंगाम कालावधीत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे मदतीने कमीत कमी ३ वेळा वैद्यकीय तपासणी करणेत यावी, असे आदेश दिलेले आहेत. त्यास अनुसरुन कारखान्याचे वतीने व प्राथमिक आरोग्य केंद्र रोपळे व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गुरसाळे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २९.११.२०२५ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेमध्ये आपले कारखान्यामध् सन २०२५ - २६ हंगामात ऊस तोडणी मजूराकरिता मोफत क्षयरोग, कुष्ठरोग तपासणी व इतर सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करणेत आले होते. सदर शिबीरादरम्यान क्षयरोग, कुष्ठरोग तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर तपासणी, ई.सी.जी. अस्थीरोग व स्त्रीरोग तपासणी अशा विविध तपासणी करुन त्यावरील उपचार मोफत करणेत आले. सदर शिबीराचे 'उद्घाटन कारखान्याचे संचालक जनक माणिक भोसले, कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजीत(आबा) पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधीलकी जपत ऊस तोडणी मजूरासाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये नामांकीत डॉक्टर उपस्थित राहिले असून त्याचा सर्वांनी लाभ घेवून तपासणी करुन घ्यावी. शासनाच्या निर्देशानुसार आपण सिझन संपेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील शनिवारी अशी शिबीरे आयोजित करणार आहेत. तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील गटामध्ये व गांवामध्ये फिरते पथकामार्फतही ऊस तोडणी मजूरांची तपासणी करुन औषधोपचार करणार आहोत. तरी सर्वांनी तपासणी करुन घ्याव्यात असे आवाहन त्यांनी केले.
स्वागत व प्रस्ताविकात बोलताना कारखान्याचे केन मॅनेजर ए. डी. वाघ म्हणाले की, सर्वरोग निदान व उपचार या शिबीराचे सर्वांनी महत्व पटवून घेवून वेगवेगळ्या आजारावरांचे निदान करुन उपचारात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. तरी या सर्वरोग निदान शिबीराचा जास्तीत जास्त ऊस तोडणी मजूरांनी लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.
हे शिबीर यशस्वी होणेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र रोपळेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा तरळगट्टी, गुरसाळे उपकेद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सचिन गुटाळ मेंढापूर समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देवकते, भोसे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द नाईकनवरे, अजोती समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पुजा पवार, जनरल फिजीशन डॉ. सौरुप साळुंखे, प्राथमिक आरोग्य केंद्र रोपळे, उपकेंद्र गुरसाळे यांचा सर्व स्टाफ व आशा वर्कर तसेच कारखान्याचे मुख्यशेती अधिकारी ए.व्ही.गुळमकर व फिल्ड स्टाफ यांनी शिबीर यशस्वीपणे पार पाडणेसाठी परिश्रम घेतले. या शिबीरामध्ये १७० जणांची तपासणी करणेत आली.
सदर कार्यक्रमास कारखान्याचे संचालक संभाजी भोसले, कालिदास पाटील, प्रविण कोळेकर, सिध्देश्वर बंडगर, विठ्ठल रणदिवे कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, ऊस तोडणी मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितीतांचे आभार कारखान्याचे लेबर अॅण्ड वेल्फेअर ऑफिसर बी. एस. पाटील यांनी मानले व असि. ऊस विकास अधिकारी यु.व्ही.बागल सुत्र संचलन केले.
Reactions

Post a Comment

0 Comments