एआय' महाविस्तार ॲप बाबत कृषी विभागातील अधिकारी यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
बार्शी (कटूसत्य वृत्त):- श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालय बार्शी व कृषी विभाग बार्शी संयुक्त विद्यमाने बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे महा कृषी विस्तार 'एआय' ॲप वापर करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती व्हावी, यासाठी बार्शी तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांच्यावतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तर कृषी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एस. शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करून कसे वापरायचे याविषयी मार्गदर्शन केले. त्याचवेळी शेतकऱ्यांना ॲप वापरण्याबाबत ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर करून प्रत्यक्ष ॲप कसे वापरून फायदा घेता येईल याविषयी मार्गदर्शन केले याप्रसंगी कोरफळे येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी प्रा.गणेश जाधव ,कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री. गणेश पाटील व इतर कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते .या अॅपमधून आपण शेतीबद्दल, शेतीशी निगडीत विविध माहिती मिळवू शकणार आहे. शेती सल्ला, हवामान अंदाज, पिकांची लागवडीपासून ते काढणी पश्चात माहिती, बियाणे, कीड-रोग नियोजन याबद्दल माहिती मिळणार असल्यामुळे याचा वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
.jpg)
0 Comments