जात-पात-धर्म-पंथ बाजूला ठेवून पंढरपूरचा विकास समोर ठेऊन भाजपा उमेदवाराला निवडून आणायचे आहे- प्रशांत परिचारक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 1, 2025

जात-पात-धर्म-पंथ बाजूला ठेवून पंढरपूरचा विकास समोर ठेऊन भाजपा उमेदवाराला निवडून आणायचे आहे- प्रशांत परिचारक

 जात-पात-धर्म-पंथ बाजूला ठेवून पंढरपूरचा विकास समोर ठेऊन भाजपा उमेदवाराला निवडून आणायचे आहे- प्रशांत परिचारक






पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-

गरिबी संपवायची असेल तर अर्थकारण मजबूत झाले पाहिजेकेंद्र व राज्य सरकार मधून एवढा निधी उपलब्ध असताना फाटकी झोळी उपयोगाची नाही, विकास आणि सकारात्मक बदल हवा असेल तर जात-पात-धर्म-पंथ बाजूला ठेवून पंढरपूरचा विकास समोर ठेऊन भाजपा उमेदवाराला निवडून आणायचे आहे अफवांना बळी पडू नका असे आवाहन माजी आमदार श्री प्रशांत परिचारक यांनी केले.

माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी कालिकादेवी चौक येथे झालेल्या कॉर्नर प्रचारसभेत जातीधर्मांच्या पलीकडे जाऊन आपण सर्व जनतेसाठी त्यांची गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही देऊन या परिसरातील मुस्लिम व ईतर समाजातील लोकांची मने जिंकली.

या प्रचारसभेत व्यासपीठावर इक्बाल बागवानउमेदवार सुजीत सर्वगोडरेहाना बोहरीगुरु दोडिया, भागवत बडवे, मानेताई तसेच या भागातील स्थानिक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रशांत परिचारक म्हणाले मोठे मालक स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी कधीही जातधर्मपंथ हे पाहून राजकारण केले नाही. वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना नगराध्यक्ष म्हणून संधी दिली. आज केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे.

पंढरपूर साठी त्यांचा विकासाचा दृष्टिकोन आहेमग सरकार ज्या पक्षाचा आहे त्याच पक्षाचा कारभारी निवडला पाहिजेयाचा फायदा सगळ्यांना होणार असून रोजगार मिळणार आहे. सर्वात जास्त गरीबी ही आज मुस्लिम समाजात आहेमाझे काही बिघडत नाहीमी आमदारखासदार नाहीपण तरीही माझ्या नावाचा वापर करून राजकारण सुरू आहेआम्ही संपणार नाही. सर्वांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेतपुर्वी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक आणि भागवताचार्य वा ना उत्पात यांनी फरशी गल्ली या मंदिर परिसरात इब्राहिम बोहरी यांना निवडून आणले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक योजना गोरगरीब जनतेसाठी आणल्या लाडकी बहीण योजना जात पाहून दिली नाही१८ कोटी शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री फंडातून कर्ज दिले जात आहे गरिबांसाठी पाच लाख रुपयांची आरोग्यविमा योजना सुरू केली आहे.

उद्या निवडणूक झाली की हे सरकोलीला निघून जातील. यांचा डोळा नगरपालिकेत येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीवर आहे, भविष्यात पंढरीत दरवर्षी पाच कोटी भाविक येणार असून अडीच हजार कोटी रुपये पंढरीच्या व्यापारीदुकानदार, व्यावसायिकांना मिळणार आहेत. कालिकादेवी चौक येथील प्रचारसभेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे विचार ऐकण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages