द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई द्या
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिरपनहळ्ळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी हे शासनाच्या अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहिले असून त्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे. अतिवृष्टी झाल्याने द्राक्ष या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे फेर पंचनामा करून बाधित शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सिध्दाराम हेले, राजकुमार शंकर बिराजदार, चंडकांत गौरीशंकर पाटील, ज्ञानेश्वर भुड, सिध्दाराम बचाट, पंडित बिराजदार, महेश विराजदार, अनिल जाधव, भौरीनाथ बिराजदार, अस्मिता जाधव, दादाराव जाधव, सागर बिराजदार, नागनाथ बचटे, अप्पू शेख, श्रीशैल बिराजदार, मारुती जाधव, चन्नवीर बिराजदार, राहुल बिराजदार, राजकुमार बिराजदार, संजय बिराजदार, रविकांत बिराजदार यांच्यासह आदी शेतकऱ्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

0 Comments