Hot Posts

6/recent/ticker-posts

मतदान व मतमोजणी केंद्रांवरील सुविधांबाबत दुसरी समन्वय बैठक संपन्न

 मतदान व मतमोजणी केंद्रांवरील सुविधांबाबत दुसरी समन्वय बैठक संपन्न





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज दि. 22 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्रे व मतमोजणी केंद्रांवरील सुविधांसह निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत दुसरी समन्वय बैठक घेण्यात आली. ही बैठक महापालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मतदारांसाठी सोयी, सुरक्षा व्यवस्था तसेच मतमोजणी केंद्रांवरील नियोजन यावर चर्चा करण्यात आली. यासोबतच नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया, अर्जांची छाननी, निवडणूक जाहिरातींसाठीचे नियम, तसेच कॉर्नर सभा व प्रचार कार्यक्रम राबविताना घ्यावयाची परवानगी व आचारसंहितेचे पालन याबाबत उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्पष्ट केले की, अर्ज भरणे व अर्ज छाननी ही प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक पद्धतीने पार पडेल. कोणतीही अपूर्ण माहिती किंवा नियमबाह्य बाब आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच जाहिराती व कॉर्नर सभा घेण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी आवश्यक असून, निर्धारित वेळ, ठिकाण व ध्वनीमर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील.राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी परस्पर समन्वय साधून निवडणूक प्रक्रिया शांततामय व सुरळीत पार पाडावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. कोणत्याही प्रकारचा नियमभंग होणार याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली असून, निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याची तयारी सर्व राजकीय पक्षांनी दर्शविली.यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, उपजिल्हाधिकारी, रो.ह.यो.श्रीमती अंजली मरोड,उपजिल्हाधिकारी, भूसंपादनश्री अभिषेक देशमुख,उपविभागीय अधिकारी सोलापूर श्री सदाशिव पडदुणे, उपविभागीय अधिकारी,श्री भैरप्पा रामू माळी,उपविभागीय अधिकारी,श्रीमती विजया पांगारकर,उपविभागीय अधिकारी श्री सचिन इथापे,उपविभागीय अधिकारी,श्रीमती जयश्री आव्हाड,सह. आयुक्त गिरीष पंडित यांच्या सह राजकीय पक्षचे प्रतिनिधी उपस्थिती होते.
Reactions

Post a Comment

0 Comments