दिल्लीतल्या केंद्रीय मार्गदर्शक शिबिरात नागणसूर महास्वामीजींचा सहभाग
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दिल्ली येथे विश्व हिंदू परिषदेच्यावतीने आयोजित केंद्रीय मार्गदर्शक शिबिरात अखिल भारत वीरशैव शिवाचार्य संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नागणसूर मठाचे मठाधिपती श्री श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजींनी सहभाग घेऊन विविध विषयांवर मार्गदर्शन केले. देशातील सुमारे तीनशे संत, महंत, शिवाचार्य गण उपस्थित आहेत.
दिल्लीत केंद्रीय मार्गदर्शक मंडलाची बैठक झाली.या बैठकीत मंदिर मुक्ती अभियान, धर्म स्वातंत्र्य कायदा,नशा मुक्ती अभियान, जनगणना असंतुलन या विषयावर चर्चा झाली. या चर्चेसत्रात नागणसूर मठाचे मठाधिपती श्री श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.
महास्वामीजी मार्गदर्शन करताना म्हणाले, हिंदू धर्म सर्व श्रेष्ठ धर्म असून हिंदू धर्मातील आचार विचार संपूर्ण जगाला मार्गदर्शक आहेत. धार्मिक,सामाजिक, सांस्कृतिक विचारात जास्तीत जास्त युवकांना संधी दिली पाहिजे.युवकांना धर्माची जाणिव करुन देणे काळाची गरज आहे. देशातील सर्व मंदिरे वाचली पाहिजे.युवक नशेकडे वळत आहेत याचाच अर्थ धर्माचे मार्गदर्शन कमी पडत आहे का अशी खंत व्यक्त केली. लोकसंख्या असमतोल का होत आहे. यावर पाश्चिमात्य देशांचा वाईट परिणाम होत आहे का याचा अभ्यास होणे काळाची गरज आहे. अशा विविध विषयांवर अखिल भारत वीरशैव शिवाचार्य संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजीनी प्रभावीपणे मत व्यक्त केले.

0 Comments