Hot Posts

6/recent/ticker-posts

सिंहगड पब्लिक स्कूल चा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक

 सिंहगड पब्लिक स्कूल चा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक




वाखरी,पंढरपूर येथे 53 वे तालुकास्तरीय दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन शिक्षण विभाग,पंचायत समिती,पंढरपूर यांनी आयोजित करण्यात आले  होते.
    यामध्ये पंढरपूर तालुक्यातील  प्राथमिक व माध्यमिक गटातून 225 पेक्षा जास्त प्रयोग विज्ञान प्रदर्शनात मांडण्यात आले होते.यामध्ये सिंहगड प्रशालेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते.  यामध्ये प्राथमिक विभागातील इयत्ता सातवीतील ईशान गाडेकर व पियुष राठोड यांनी नाविन्यपूर्ण असे आधुनिक शेतीसाठी ॲग्रीबोट नावाचे उपकरण बनविण्यात आले होते. या उपकरणाचा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक आलेला असून या उपकरणाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड करण्यात आलेली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष एम.एन. नवले सर, कॅम्पस डायरेक्टर डॉ .कैलाश करांडे तसेच सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी, पंढरपूरच्या प्राचार्या.सौ. स्मिता नवले , मुख्याध्यापिका सौ. स्मिता नायर , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments