नोकराच्या अमानुष अत्याचार प्रकरणी अतुल खुपसे यांचा जामीन फेटाळला
मु. पो. दहिवली ता. माढा येथील निखिल लांडगे या नोकराचा अमानुष जाच व जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सामाजिक संघटनेचा अध्यक्ष अतुल भैरवनाथ खुपसे याचा जामीन अर्ज बार्शी जिल्हा व सत्र न्यायालय यांनी फेटाळला.
सविस्तर मिळालेली माहिती अशी की दि. ९/५/२०२५ पासून निखिल लांडगे हा अतुल खुपसे याच्या शेतात कामाला होता. तद्पासून इमानदारीने काम करून देखील अतुल खुपसे हा निखिल याच्यावर जातीवाचक शिवीगाळ करणे, मारहाण करणे, डांबून ठेवणे असा अमानुष अत्याचार करत असे. दि. २०/०९/२०२५ रोजी कामाला असताना अतुल खुपसे आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने निखिल लांडगे यास मारहाण करून "सिपॉवर हे विषारी औषध" पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे देण्यात आली.
त्यावर अतुल खुपसे याने अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी येथे दाखल केला. त्यामध्ये मूळ फिर्यादी निखिल लांडगे यांच्या तर्फे अॅड. रणजीत रा. चौधरी यांनी आपली बाजू मांडत आरोपी अतुल खुपसे हा सराईत गुन्हेगार असून कशाप्रकारे आपल्या नोकरावर अत्याचार केला व तो तालुक्यात इतर लोकांवर कसा अन्याय करतो व त्याच्यावर एकूण 26 गुन्हे नोंद असल्याचे मे. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले, सदर मुळ फिर्यादींच्या अॅड. रणजीत रा. चौधरी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरत मे. जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी यांनी याचा अटकपूर्व जामीन फेटाळला.
याप्रकरणी मुळ फिर्यादीतर्फे अॅड. रणजीत रा. चौधरी, अॅड. मिरगणे, सरकारी वकील D.D. देशमुख यांनी तर आरोपीतर्फे A.R. पाटील यांनी काम पाहिले.
0 Comments