अजहर हुंडेकरीसह दहा जणांवर गुन्हा दाखल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास आयेशा नगर समोर सार्वजनिक रोडवर शांतीनगर जवळ मजरेवाडी नई जिंदगी सोलापूर” येथे यातील MIM पक्षाचे माजी नगरसेवक अहजर हुंडेकरी, अजहर शेख, अजहर जागीरदार, शोहेब चौधरी, मुन्वर शेख, जब्बार शेख, यासह इतर चार ते पाच अनोळखी इसम सर्व राहणार नई जिंदगी सोलापूर” यांनी पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी प्रसिद्ध केलेले कलम 33 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत पाच किंवा अधिक व्यक्तीच्या कोणत्याही संमेलनासह प्रतिबंध सामाजिक मेळावा आणि क्लब सहकारी संस्था इतर सोसायटी आणि संघटना यांचे सामान्य व्यवहार करण्यासाठी त्याची बैठक आणि इतर मनाई आदेश पारित केले असता” व सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने आचारसंहिता चालू असताना यातील आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव जमून विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी सामाजिक मेळावा घेत असताना मिळून आले आहे”.
म्हणून यातील फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल महेश रामचंद्र माळी नेमणूक एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर” यांनी दिलेल्या फिर्यादीवरून MIM पक्षाचे माजी नगरसेवक अजहर हुंडेकरी, अजहर शेख, शोहेब चौधरी, अजहर जागीरदार, मुन्वर शेख, जब्बार शेख यासह चार ते पाच जणांना विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय साहित्याचे कलम 223, 189, / 2, 190 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37/3 सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले.असून जर कोणीही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या वतीने विनापरवाना सभा, बैठका, रॉयली काढल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आव्हान एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी केले आहे.

0 Comments