मुळेगाव तांड्यावर धाड; दारूच्या भट्ट्या उध्वस्त
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या अनुषंगाने मुळेगांव तांडा ता. दक्षिण सोलापूर येथील 03 अवैध हातभट्टी दारुच्या भट्टया उध्दवस्त करुन 03 गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण 14,600 लि. गुळमिश्रित रसायन व साहित्य असे एकूण 6,18,400 /- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या अनुषंगाने अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयामध्ये अवैध दारु निर्मिती भागात छापाकारवाई करुन हातभट्टी दारुची वाहतूक होणार नाही या करीता कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना आदेशीत केले होते. त्याप्रमाणे दिनांक 25/12/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे 04 पथके तयार करुन स्वत: पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकांनी मुळेगांव तांडा येथील हातभट्टी दारु निर्मिती व विक्री होत असलेल्या ठिकाणांची माहिती काढून एकूण 03 अवैध हातभट्टी दारु निर्मितीच्या ठिकाणी छापे मारुन हातभट्टी दारु तयार करण्याकरीता लागणारा गुळमिश्रीत रसायन साठा असा एकूण 73 बॅरेलमधील 14,600 लिटर गुळमिश्रित रसायन साठा मिळून आल्याने जागीच नाश करुन कारवाई करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या कालावधीमध्ये अवैध दारुधंदयावर कडक कारवाई करण्यात येणार असून वारंवार गुन्हे करणाज्या इसमांविरुध्द कडक प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विशाल वायकर, नागनाथ खुणे, विजय शिंदे, भिमगोंडा पाटील यांचेसह एकूण 24 पोलीस अंमलदार यांनी सदरची कारवाई केली आहे.

0 Comments