जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
अकलूज (कटूसत्य वृत्त):-वाढदिवसाच्या कार्यक्रमावर अवास्तव खर्च करण्यापेक्षा त्याचा सदुपयोग करावा या स्तृत्य हेतूने शंकर अंबादास भिताडे यांनी जि. प. शाळा, चाकोरे येथील मुलांना खाऊ वाटप केला आहे.
शंकर भिताडे हे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा चाकोरे, ता. माळशिरस, जि. सोलापूर चे शालेय व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. त्याच्या वाढदिवसा निमित्त शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या वाढदिवसा निमित्त अवास्तव खर्च करणे त्यांना आवडत नाही. त्यापेक्षा शाळेतील चिमुकल्या मुलांना खाऊ वाटप करणे, सामाजिक उपक्रम राबवणे, गरजुंना मदत करणे अशी कामे ते करतात.
त्यांच्या वाढदिवसा निमित्त ग्रा. प. सदस्य सुरेश पाटील, तानाजी पाटील, धनाजी वाघमोडे, अमोल जगताप, बाबुराव पाटील, मोहन घाडगे, बापूराव वाघमोडे, अंकुश शिंदे व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

0 Comments