सोलापूर(कटूसत्य वृत्त):- दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना 5 सक्षम शिक्षण देणे ही समाजाची महत्त्वाची जबाबदारी आहे, असे मत प्राचार्या गीतांजली पिरगोंडे यांनी व्यक्त केले.
होटगी रोड येथील सुरवसे प्रशालेत जागतिक दिव्यांग दिन प्राचार्या पिरगोंडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्या पिरगोंडे बोलत होत्या. या कार्यक्रमास प्रशालेचे पर्यवेक्षक सचिन लांडगे, ज्येष्ठ शिक्षक विनायक घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दिव्यांग विद्यार्थी ओम सलगर याचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व बुके देऊन सत्कार करण्यात आला. पिरगोंडे म्हणाल्या, दिव्यांग मुलांमध्ये अपार क्षमता असते. त्यांना योग्य संधी, प्रोत्साहन आणि शिक्षण दिल्यास तेही विविध क्षेत्रात यश मिळवू शकतात. समाजातील सर्व घटकांनी सहकायांची भूमिका निभावणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमास रंगनाथ चौखंडे, नागेश हिरेमठ, श्रीशैल तळवार, दीपा साळुंखे, श्याम पाटील, पंकज साळुंखे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments