Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरात रविवारी मातंग समाज उद्योजकता कार्यशाळा

 सोलापूरात रविवारी मातंग समाज उद्योजकता कार्यशाळा





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- क्रांती गुरु लहुजी साळवे यांची जयंती आणि भारतीय संविधान दिनानिमित्त मातंग समाज कृती समिती आणि मातंग बिजनेस असोसिएशन शाखा सोलापूर यांच्या वतीने मातंग समाज उद्योजकता कार्यशाळा रविवार दि. 7 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सोलापुरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अध्यक्ष युवराज पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
         मातंग समाजातील तरुण वर्ग शिक्षणाकडे वळाला आहे. त्यांना शैक्षणिक, व्यावसायिक, नोकरी संदर्भातील मार्गदर्शन आवश्यक आहे. मातंग समाजातील तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून धेनू टेक सोल्युशन्स पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष खवळे, मातंग बिजनेस ग्रुपचे डॉ. पांडुरंग साबळे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी मातंग समाज कृती समिती शहर अध्यक्ष ॲड. शैलेशकुमार पोटफोडे, मातंग समाज कृती समिती जिल्हा अध्यक्ष युवराज पवार, मातंग बिजनेस असोसिएशन शाखा सोलापूर प्रा. डॉ. दिगंबर झोंबाडे, रमेश बोराडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यशाळेचा अधिकाधिक तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
       या पत्रकार परिषदेस ॲड. शैलेश पोटफोडे, युवराज पवार, राजू क्षीरसागर, प्रा. दिगंबर झोंबाडे, रमेश बोराडे, हिरालाल आडगळे, शिवाजी गायकवाड, विकी पवार, प्रभाकर कांबळे, श्रीकांत देडे, शशिकांत डोलारे, अमोल पोटफोडे आदी उपस्थित होते.



Reactions

Post a Comment

0 Comments